तुमची चिंता संपली! फोनमध्ये आत्ताच ऑन करा हा ऑप्शन, आपोआप डिलीट होईल OTP
आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. यातील अनेक फीचर्स युजर्सच्या सुरक्षेसाठी देण्यात आलेले असतात. पण अनेकांना या फीचर्सबद्दल माहितीच नसते. आज आम्ही तुम्हाला अशा फीचर्सबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल 90 टक्के लोकांना माहिती नाही. आपण कोणत्याही अॅपमध्ये लॉगइन करताना किंवा बँकेशी संबंधित कोणतेही व्यवहार करताना आपल्याला एक ओटीपी (वन टाईम पासवर्ड) येतो. आपलं कामं झालं की आपण हा ओटीपी मॅन्यूअली डिलीट करत बसतो. पण आता असं करण्याची गरज नाही.
आज आम्ही तुम्हाला आपल्या स्मार्टफोनमधील अशी एक सेटिंग सांगणार आहोत, ज्यामुळे आपल्या स्मार्टफोनमध्ये आलेला कोणताही ओटीपी 24 तासांनंतर आपोआप डिलीट केला जाईल. स्मार्टफोनमधील या सेटिंगच्या मदतीने मदतीने फोनवर येणारा ओटीपी आपोआप डिलीट होईल. तुम्हाला ओटीटी शोधण्याची आणि त्यानंतर तो डिलीट करण्याची गरज नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
खरं तर आपल्या स्मार्टफोनमध्ये येणाऱ्या कोणत्याही ओटीपीची व्हॅलिडीटी किमान 10 ते 15 मिनिटांपर्यंतची असते. त्यानंतर या ओटीपीची आपल्याला काहीही आवश्यकता नसते. त्यामुळे आपलं काम झाल्यानंतर अनेकजण हा ओटीपी आपल्या स्मार्टफोनमधून डिलीट करतात. पण आपल्या स्मार्टफोनमध्ये इतके मॅसेज असतात, की आपल्याला शोधून हा ओटीपी डिलीट करावा लागतो. मात्र आता आम्ही तुम्हाला एक अशी सेटिंग सांगणार आहोत, ज्यामुळे ओटीपी आपोआप डिलीट केला जाईल.
ओटीपीचा वापर वापरकर्त्याची ओळख पडताळण्यासाठी केला जातो. सहसा, ऑनलाइन खात्यांमध्ये लॉग इन करताना, ऑनलाइन व्यवहार करताना किंवा ऑनलाइन सेवा वापरताना ओटीपी पाठवला जातो. मॅसेजद्वारे ओटीपी पाठवला जातो. त्यानंतर वापरकर्त्याला ओटीपी डायल करून त्याची ओळख व्हेरिफाईड करावी लागते. अनेक वेळा फोनमध्ये अनेक ओटीपी जमा होतात. अशावेळी आपल्या फोनचे स्टोरेज भरते. मात्र आता ओटीपी आपोआप कसा हटवायचा याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
तुमच्या स्मार्टफोनमधील Google Chrome सतत हँग होतोय का? फॉलो करा या 5 टिप्स आणि संपेल तुमची समस्या