Tech Tips: अरेच्चा! WhatsApp Chat चुकून डिलीट झाले? नो टेंशन, या सोप्या पद्धतीने करा रिकव्हर
व्हॉट्सॲपमुळे आपली अनेक कामं अगदी सोपी झाली आहेत. इन्स्टिंक्ट मॅसेजिंग ॲप व्हॉट्सॲपमुळे आपण कोणत्याही व्यक्तिला एका क्षणात मॅसेज करू शकतो. व्हॉट्सॲपचे जगभरात कोट्यावधी युजर्स आहेत. व्हॉट्सॲपवर आपल्याकडे इतके कॉन्टॅक्ट्स आणि ग्रुप आहेत, की सतत सर्वांचे मॅसेज येत असतात. अशावेळी आपण हे चॅट्स डिलीट करतो.
आता WhatsApp चॅटिंगमध्ये मिळणार अॅनिमेशनची मजा, लवकरच येणार नवीन वर्षाचं पहिलं अपडेट
अनेकदा असं होतं की, आपण एखाद्या व्यक्तिची किंवा ग्रुपची चॅट डिलीट करतो, आणि त्यानंतर जेव्हा आपल्याला पुन्हा चॅटची आवश्यकता असते तेव्हा रिकव्हर कसे करायचे हेच आपल्याला माहित नसते. पण यासाठी एक सोपी पद्धत आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी काही क्षणात चॅट रिकव्हर करू शकता. परंतु यासाठी तुमच्याकडे चॅट बॅकअप असणं आवश्यक आहे. तुम्ही व्हॉट्सॲपमध्ये डिलीट केलेल्या चॅट्स कशाप्रकारे रिकव्हर करू शकता, याबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
जर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲपवर डिलीट केलेले चॅट्स रिकव्हर करायच्या असतील, तर तुमच्या व्हॉट्सॲप डेटाचा बॅकअप रिस्टोअर करणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. जर तुम्ही चॅट डिलीट करण्यापूर्वी नियमित बॅकअप सेट केला असेल, तर तुम्ही सहजपणे ॲपमध्ये डेटा इंपोर्ट करू शकता आणि तुमच्या चॅट रिकव्हर करू शकता.
चॅट्सचा बॅकअप घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी गूगल ड्राइव्ह वापरणे. तुम्ही गूगल ड्राइव्हवर आधीच बॅकअप घेतला असल्यास, तुमच्यासाठी चॅट रिकव्हरी खूप सोपी असेल.
Tech Tips: WhatsApp वर अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल मॅसेजमुळे वैतागलात? आत्ताच करा ही सेटिंग
व्हॉट्सॲपवर तुम्ही नंबर सेव्ह न करता देखील मॅसेज पाठवू शकता. यासाठी, प्रथम न्यू चॅटवर क्लिक करा आणि वरच्या बाजूला ‘मेसेज युवर सेल्फ’ वर क्लिक करा. आता तुम्हाला ज्या नंबरवर मेसेज पाठवायचा आहे तो नंबर तुम्हाला सेंड करा. नंबर पाठवल्यानंतर त्यावर क्लिक करून चॅट विथ थिस नंबरवर क्लिक करा. असे केल्याने तुम्ही त्या व्यक्तीशी सहज चॅट करू शकाल, तेही नंबर सेव्ह न करता.