Tech Tips: Mail ही केला जाऊ शकतो शेड्यूल! या स्टेप्स करतील तुम्हाला मदत
गुगलची लोकप्रिय ईमेल सेवा Gmail आपल्याला क्षणोक्षणी फायद्याची ठरत आहे. ऑफीस असो किंवा कॉलेज आपल्याला आपले महत्त्वाचे डॉक्युमेंट मेल करण्यासाठी सांगितंल जातं. Gmail हा एक अधिकृत मार्ग मानला जातो, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट किंवा तुमचा मॅसेज शेअर करू शकता. जगभरातील करोडो लोकं Gmail चा वापर करतात.
Google Map Update: प्रवास करताना टोलचे पैसे वाचवायचे? गुगल मॅपची ही ट्रीक करणार मदत
गुगल Gmail युजर्ससाठी नेहमी नवीन फीचर्स लाँच करत असते, ज्यामुळे युजर्सचा Gmail वापरण्याचा अनुभव अधिक मजेदार होतो. अलिकडेच कंपनीने Gmail मध्ये एआयचा देखील समावेश केला आहे. तुम्हाला एखाद्या मेलला उत्तर देताना अडचण येत असेल किंवा तुम्हाला समजत नसेल की मेलला काय उत्तर द्यावं, तर अशावेळी तुम्हाला Gmail मध्ये असलेली एआय मदत करणार आहे. यासोबतच Gmail मध्ये आणखी एक फीचर आहे, ज्याबद्दल अनेक लोकांना माहितीच नाही. या फीचरच्या मदतीने तुम्ही Gmail शेड्युल करू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
म्हणजेच तुम्हाला एखाद्या ठरावीक वेळी कोणत्या व्यक्तिला Gmail करायचा असेल तर तुम्हाला त्या वेळेची वाट पाहण्याची गरज नाही. तुम्ही काही सोप्या स्टेप्सच्या मदतीने Gmail शेड्युल करू शकता. तुम्ही ज्या वेळेसाठी हा मेल शेड्युल केला असेल, तो त्या वेळेत आपोआप सेंड केला जाईल. त्यामुळे आता मेल टाईप करून सेव्ह करण्याची कटकट संपली. तुम्हाला मेल टाईप केल्यानंतर तो योग्य वेळेसाठी शेड्युल करायचा आहे. पण यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. त्यानंतर तुम्ही अगदी चुटकीसरशी तुमचे मेल शेड्युल करू शकणार आहेत.
Tech Tips: तुम्हीही लग्नात गेल्यानंतर मोबाईल फोटोग्राफी करताय? फोनचा कॅमेरा होऊ शकतो खराब