BSNL Kavach Number: महिलांच्या सुरक्षेसाठी कंपनीने उचलले महत्त्वाचे पाऊल, आता रिचार्ज करताना लपवता येणार मोबाईल नंबर!
बीएसएनएल कवच नंबर एक अशी सुविधा आहे, जी महिलांचा मोबाईल नंबर सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करणार आहे. या फीचरअंतर्गत यूजर्सना एक 10 अंकी तात्पुरता किंवा पर्यायी नंबर दिला जाणार आहे. हा नंबर यूजरचा खऱ्या मोबाईल नंबरसोबत लिंक असणार आहे. जेव्हा जेव्हा एखाद्या महिलेला तिचा फोन रिचार्ज करायचा असतो किंवा सार्वजनिक ठिकाणी तिचा नंबर द्यायचा असतो तेव्हा ती तिच्या खऱ्या मोबाईल नंबरऐवजी हा तात्पुरता कवच नंबर वापरू शकते. अशा प्रकारे, तिचा खरा नंबर अनोळखी लोकांसोबत शेअर केला जात नाही आणि तिची गोपनीयता राखली जाते. (फोटो सौजन्य – Pinterest)
बीएसएनएलने दिलेल्या माहितीनुसार, कवच नंबर एका प्रकारच्या सुरक्षित थराप्रमाणे काम करते. यूजरला बीएसएनएलकडून एसएमएसद्वारे 10-अंकी पर्यायी नंबर दिला जाणार आहे. हा नंबर यूजरच्या मोबाईल नंबरसोबत लिंक असणार आहे. जेव्हा यूजर रिचार्ज करतो, तेव्हा त्यांना स्वत:च्या मोबाईल नंबरऐवजी हा पर्यायी नंबर दिला जाऊ शकतो. सिस्टम तो तात्पुरता नंबर ओळखते आणि रिचार्ज खऱ्या मोबाइल नंबरवर पोहोचवते. याच्या मदतीने तुम्ही रिचार्ज देखील करू शकता आणि तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर देखील शेअर करावा लागणार नाही.
बीएसएनएलने हे फीचर वापरण्यास खूप सोपे केले आहे. यूजर खालील स्टेप्स फॉलो करून कवच नंबर मिळवू शकतात:






