Tech Tips: तासंतास स्मार्टफोन वापरण्याच्या सवयीमुळे हैराण झालात? या टीप्स करतील तुम्हाला मदत
स्मार्टफोन म्हणजे आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. स्मार्टफोनशिवाय आपली कोणतीही कामं होऊ शकत नाहीत. स्मार्टफोनने आपलं जीवन अतिशय सोपं केलं आहे. अगदी कोणतंही कामं असो आपला स्मार्टफोन आपल्याला मदत करतो. मॅसेज, कॉल, ऑनलाईन पेमेंट, फोटो काढणं, व्हिडीओ बघणं, अशी अनेक कामं आपण आपल्या स्मार्टफोनच्या मदतीने करू शकतो. सततच्या वापरामुळे आपण आपला स्मार्टफोन सतत आपल्या सोबत ठेवतो. पण यामुळे आपल्याकडून स्मार्टफोनचा अतिवापर केला जातो.
आता क्रेडीट कार्डने करा UPI पेमेंट, ही आहे लिंक करण्याची सोपी प्रोसेस! जाणून घ्या सविस्तर
स्मार्टफोनचा अतिवापर आपल्यासाठी अतिशय धोकादायक आहे. स्मार्टफोनमुळे आपल्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. सतत स्मार्टफोनच्या वापरामुळे डोळ्यांवर परिणाम होतो. मात्र तासनतास स्मार्टफोन वापरण्याची सवय सोडवणे गरेजचं आहे. हे अवघड वाटत असलं तरी अशक्य नाही. तुम्ही अगदी काही सोप्या टीप्सच्या मदतीने तासनतास स्मार्टफोन वापरण्याची सवय सोडवू शकता. यासाठी फक्त तुम्हाला काही टीप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
दिवसभर स्मार्टफोन वापरण्यासाठी एक निश्चित वेळ मर्यादा सेट करा. उदाहरणार्थ, सोशल मीडियाचा वापर फक्त 30 मिनिटांपर्यंत मर्यादित करा. तुमच्या फोनवर स्क्रीन टाइम ट्रॅकिंग वैशिष्ट्य वापरा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्ही किती वेळ वाया घालवत आहात.
स्मार्टफोनवर वारंवार येणाऱ्या नोटिफिकेशनमुळे आपलं लक्ष विचलित होतं. यावरील उपाय म्हणजे अनावश्यक ॲप्सच्या नोटिफिकेशन बंद करा. यामुळे तुमचे लक्ष पुन्हा पुन्हा फोनकडे जाणार नाही. ज्यामुळे तुम्ही तुमचं कामं अगदी व्यवस्थित करू शकाल.
दर आठवड्याला एक दिवस डिजिटल डिटॉक्स करा. या दिवशी फोन अजिबात वापरू नका. त्याऐवजी, एखादे पुस्तक वाचा, कुटुंबासोबत वेळ घालवा किंवा काही सर्जनशील अॅक्टिव्हिटीमध्ये भाग घ्या. यामुळे मोबाईलच्या स्क्रीनचा त्रास देखील आपल्या डोळ्यांना होणार नाही.
तुमचा फोन नेहमी आवाक्याबाहेर ठेवा, विशेषतः जेव्हा तुम्ही अभ्यास करत असाल, काम करत असाल किंवा कुटुंबासोबत वेळ घालवत असाल. झोपताना फोन बेडपासून दूर ठेवा म्हणजे रात्री फोन तपासण्याची सवय संपेल. फोनचा वापर जेवढा कमी असेल तेवढं तुमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होणार आहे.
तुमच्या स्मार्टफोनमध्ये फक्त तेच ॲप्स ठेवा जे तुमच्यासाठी उपयुक्त आहेत. निरुपयोगी गेम आणि सोशल मीडिया ॲप्स हटवा. ज्यामुळे स्मार्टफोनवर तुमचा अतिरिक्त वेळ वाया जाणार नाही.
मोबाईलपेक्षा मित्र आणि कुटुंबासह वास्तविक जीवनात वेळ द्या. तुम्ही तुमच्या प्रियजनांशी जितके जास्त कनेक्ट व्हाल तितकी तुम्हाला तुमच्या फोनची गरज कमी वाटेल. फोनला पर्याय शोधण्यासाठी, चित्रकला, बागकाम, योग किंवा संगीत यासारखे नवीन छंद जोडा. या उपक्रमांमुळे तुमचा वेळ तर चांगल्या कामांसाठी वापरला जाईल तसेच मानसिक शांतीही मिळेल.
स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे केवळ वेळच वाया जात नाही तर तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. स्मार्टफोनचा अतिवापर आपल्या आरोग्यावर नकळतपणे घातक परिणाम करतो. तुम्ही सतत तुमच्या स्मार्टफोनचा वापर केला, तर स्मार्टफोनच्या स्क्रिनमधून येणाऱ्या रेजमुळे तुमच्या डोळ्यांवर परिणाम होतो.