iPhone 17 च्या कॅमेऱ्याला टक्कर देतात हे Android फोन्स, कमी पैशांत मिळणार DSLR-सारखा रिझल्ट
iPhone 17 स्मार्टफोन हाय-एंड कॅमेरा फीचर्ससह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचे कौतुक सर्वत्र सुरु आहे. मात्र या स्मार्टफोनती किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे आता आम्ही तुम्हाला अशा काही अँड्रॉईड स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत, जे कमी किंमतीत आयफोन 17 सारखे कॅमेरा फीचर्स ऑफर करतात.
या फोनची किंमत 79,999 रुपये आहे. या फोनमध्ये 48MP + 10.8MP + 13MP चा ट्रिपल कॅमेरा सिस्टम आहे, जे 5x ऑप्टिकल झूम आणि चांगले कलर रीप्रोडक्शन ऑफर करतो. हा फोन त्याच्या कॅमेरा सॉफ्टवेयर आणि AI इमेज प्रोसेसिंगसाठी ओळखला जातो. सेल्फीसाठी यामध्ये 10.5MP चा कॅमेरा आहे जो स्किन टोन नैसर्गिक ठेवतो. Google Tensor G5 चिप समर्थित, हा फोन 4970mAh बॅटरी आणि अँड्रॉइड 16 सह येतो. हा फोन अशा कंटेंट क्रिएटर्ससाठी आदर्श आहे ज्यांना फोटोंमध्ये डीप रंग आणि AI एडिटिंग आवडते. (फोटो सौजन्य – Pinterest)
या फोनची किंमत 74,999 रुपये आहे. Samsung चा Galaxy S25 फोन त्याच्या स्थिर व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि डायनामिक रेंजसाठी ओळखला जातो. या फोनमध्ये 50MP + 10MP + 12MP चा कॅमेरा सेटअप आहे, जो “Super Steady Video” मोडमध्ये देखील 3x झूमवर क्लियर फुटेज ऑफर करतो. 12MP फ्रंट कॅमेरा उत्तम पोर्ट्रेट्स क्लिक करतो. Snapdragon 8 Elite प्रोसेसर आणि 4000mAh बॅटरीने फोन सुसज्ज आहे.
या फोनची किंमत 63,999 रुपये आहे. OnePlus 13 कॅमेरा परफॉर्मंस आणि चार्जिंग स्पीड दोन्हीसाठी हा फोन एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 32MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे, जो प्रत्येक फ्रेममध्ये डिटेल्स उत्तम प्रकारे टिपतो. फोनमध्ये 100W फास्ट चार्जिंगसह 6000mAh बॅटरी दिली आहे. Snapdragon 8 Elite चिपसेटने हा फोन सुसज्ज आहे.
या फोनची किंमत 54,998 रुपये आहे. Vivo X200 FE त्याच्या उत्तम डिस्प्ले आणि कॅमेरा क्लॅरिटीसाठी ओळखला जातो. यामध्ये 6.31-इंच LTPO AMOLED स्क्रीन दिली आहे. ज्याची ब्राइटनेस 5000 निट्सपर्यंत आहे. आउटडोर फोटोग्राफीमध्ये देखील विजिबिलिटी कमी होत नाही. 50MP + 50MP + 8MP ट्रिपल कॅमेरा आणि 50MP फ्रंट कॅमेऱ्याने फोन सुसज्ज आहे.
मोबाईल गेमिंगची मजा होणार द्विगुणीत, खेळताना जाणवणार नाही थकवा… आजच खरेदी करा या अॅक्सेसरीज
या फोनची किंमत 53,999 रुपये आहे. Xiaomi 15 फोटोग्राफी आणि बॅटरी बॅलेंस दोन्हीमध्ये पुढे आहे. यामध्ये 50MP ट्रिपल कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरा आहे, जो AI HDR आणि नाइट मोडमध्ये iPhone 17 सारखी क्लॅरिटी देतो. Snapdragon 8 Elite प्रोसेसर आणि 5240mAh बॅटरीसह हा फोन लाँच करण्यात आला आहे. कमी बजेटमध्ये फ्लॅगशिप-लेव्हल कॅमेरा हवा असलेल्या वापरकर्त्यांसाठी, Xiaomi 15 हा एक स्मार्ट पर्याय आहे.






