Samsung Galaxy S26 Ultra 5G vs Vivo X300 Pro 5G: किंमत, कॅमेरा आणि परफॉर्मंसमध्ये कोणी मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
Samsung आणि Vivo या दोन्ही कंपन्या 2026 च्या सुरुवातीला फ्लॅगशिप मार्केटमध्ये त्यांचे हाय-एंड स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. एकीकडे Samsung Galaxy S26 Ultra 5G आहे, जो S सीरीजचा सर्वात एडवांस्ड फोन मानला जात आहे. तर दुसरीकडे Vivo X300 Pro 5G आहे, जो जबरदस्त कॅमेरा फीचर्स आणि पावरफुल परफॉर्मेंससाठी ओळखला जाणार असल्याचा दावा केला जात आहे. दोन्ही स्मार्टफोनचे फीचर्स वेगळे असले तरी देखील त्यांचा परफॉर्मंस जबरदस्त असणार आहे.
2026 च्या सुरुवातीला लाँच होणाऱ्या या दोन्ही स्मार्टफोनमध्ये जबरदस्त कॅमेरा, उत्तम डिस्प्ले आणि मोठी बॅटी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही स्मार्टफोनमध्ये कोण बेस्ट ठरणार आणि कोण युजर्सच्या मनावर राज्य करणार, याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, Samsung Galaxy S26 Ultra 5G ची किंमत भारतात सुमारे 1,34,999 रुपये असण्याची शक्यता आहे. तर Vivo X300 Pro 5G च्या बेस व्हेरिअंटची किंमत भारतात 99,999 रुपये असण्याची शक्यता आहे. त्यामुळे विवोचा हा आगामी स्मार्टफोन 35,000 रुपयांनी स्वस्त असणार आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन युजर्ससाठी एक चांगला आणि आकर्षक पर्याय ठरू शकतो, जो प्रिमियम फीचर्स ऑफर करतो.
Samsung त्याच्या डिस्प्ले क्वॉलिटीसाठी सर्वत्र ओळखला जातो. Galaxy S26 Ultra 5G मध्ये 6.9-इंचाचा Dynamic OLED डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि अधिक चांगली ब्राइटनेस सपोर्ट ऑफर करणार आहे.
तसेच, Vivo X300 Pro 5G मध्ये 6.78-इंचाचा फ्लॅट AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये समान 120Hz रिफ्रेश रेट आणि डायनमिक आइलँड-सारखा कटआउट दिला जाण्याची शक्यता आहे. Vivo चा डिस्प्ले देखील प्रीमियम असणार आहे, मात्र Samsung ची कलर एक्युरेसी आणि विजुअल क्लॅरिटी इंडस्ट्रीमध्ये बेस्ट मानली जाते.
Samsung Galaxy S26 Ultra 5G मध्ये क्वाड-कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये 200MP प्रायमरी Sony सेंसर, 50MP पेरिस्कोप टेलीफोटो, 12MP सेकेंडरी टेलीफोटो आणि 50MP अल्ट्रावाइड लेंस समाविष्ट असणार आहे. तर Vivo X300 Pro 5G मध्ये ट्रिपल कॅमेरा सिस्टम असणार आहे, ज्यामध्ये 200MP APO पेरिस्कोप टेलीफोटो, 50MP मेन सेंसर आणि 50MP अल्ट्रावाइड कॅमेरा समाविष्ट असणार आहे. Samsung झूम आणि डेटल्सवर लक्ष देतो. तर Vivo ची खासियत म्हणजे AI-स्मार्ट फोटोग्राफी आणि लो-लाइट परफॉर्मंस.
Samsung Galaxy S26 Ultra 5G मध्ये Snapdragon 8 Elite Gen 5 किंवा नवीन Exynos 2600 चिपसेट दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच Vivo X300 Pro 5G हा आगामी स्मार्टफोन MediaTek Dimensity 9500 प्रोसेसरने सुसज्ज असण्याची शक्यता आहे. Snapdragon चिपसेट रॉ परफॉर्मेंस आणि गेमिंगसाठी एक चांगला पर्याय मानला जातो, तर Dimensity 9500 बॅटरी एफिशिएंसी आणि AI प्रोसेसिंगसाठी एक चांगला आहे.
मोबाईल गेमिंगची मजा होणार द्विगुणीत, खेळताना जाणवणार नाही थकवा… आजच खरेदी करा या अॅक्सेसरीज
Samsung Galaxy S26 Ultra 5G मध्ये 5000mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे, जी 60W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे. तर Vivo X300 Pro 5G मध्ये 6510mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे, जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे. Vivo यामध्ये स्पष्टपणे पुढे आहे. जास्त बॅटरी क्षमता आणि जलद चार्जिंग यामुळे तो दैनंदिन वापरासाठी चांगला फोन बनतो.
दोन्ही स्मार्टफोनमध्ये AI फीचर्सवर लक्ष देण्यात आले आहे. सॅमसंग त्यांच्या Galaxy AI ची अधिक प्रगत आवृत्ती सादर करण्याची योजना आखत आहे, जी कॅमेरा, भाषांतर आणि व्हॉइस कमांडमध्ये मदत करेल. दरम्यान, विवो त्यांच्या Vivo AI Vision Engine सह इमेज प्रोसेसिंग आणि सीन डिटेक्शन अधिक स्मार्ट बनवण्यासाठी काम करत आहे.
Ans: Samsung Galaxy S26 Ultra 5G 2026 च्या सुरुवातीला, म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे.
Ans: होय, Galaxy Note सीरिजप्रमाणेच या मॉडेलमध्ये इनबिल्ट S Pen सपोर्ट दिला जाईल.
Ans: भारतात अधिकृत विक्री व किंमत तपासा, तसेच बँड सपोर्ट (5G/4G) व आगामी सॉफ्टवेअर अपडेट्सची माहिती मिळवणे उपयुक्त ठरेल.






