 
        
        E Aadhaar App Launch: घरबसल्या अपडेट करा तुमचं आधार कार्ड, नवं अॅप सोडवेल तुमच्या सर्व समस्या! रांगेत थांबण्याची गरज नाही
आधार नंबर जारी करणारी सरकारी संस्था यूनीक आईडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) लवकरच एक नवीन अॅप लाँच करण्याच्या तयारीत आहे. हे ऑल-इन-वन e-Aadhaar मोबाईल अॅप अँड्रॉईड आणि आईओएस यूजर्ससाठी लवकरच जारी केलं जाणार आहे. या अॅपद्वारे युजर्स त्यांच्या आधार कार्डमध्ये डेट ऑफ बर्थ, फोन नंबर आणि पत्ता अपडेट करू शकणार आहेत. त्यामुळे आता युजर्सना आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आधार सेवा केंद्र किंवा आधार सेंटरवर जाण्याची गरज नाही. युजर्स घरबसल्या त्यांचं आधार कार्ड अपडेट करू शकणार आहेत.
Instagram Update: युजर्सना मिळणार स्वातंत्र्य! Insta देणार तुमच्या पसंतीच्या Reels पाहण्याचा पर्याय
लवकरच हे नवीन अॅप युजर्ससाठी लाँच केलं जाणार आहे. या अॅपमुळे युजर्सना त्यांचं आधार कार्ड अपडेट करणं अगदी सहज शक्य होणार आहे. यामुळे वेळेची बचत देखील होणार आहे. आता युजर्सना आधार सेवा केंद्र किंवा आधार सेंटरवर जाऊन रांगेत थांबण्याची गरज नाही. सध्या युजर्ससाठी mAadhaar अॅप उपलब्ध आहे, ज्यामध्ये युजर्स त्यांचा आधार डेटा सेव्ह करतात. यासोबतच नवीन आधार अॅप लाँच झाल्यानंतर युजर्स घरबसल्या आधार कार्ड अपडेट करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
अपकमिंग e-Aadhaar अॅप सध्या डेव्हलप केलं जात आहे. लवकरच हे अॅप युजर्ससाठी लाँच केलं जाणार आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर UIDAI चे हे नवीन आधार अॅप यावर्षी 2025 च्या अखेरपर्यंत लाँच केले जाण्याची शक्यता आहे. हे अॅप अँड्रॉईड आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्म्ससाठी उपलब्ध असणार आहे. याच्या मदतीने युजर्स आधार कार्डमध्ये त्यांचा डेटा अपडेट करू शकणार आहे. या अॅपच्या मदतीने युजर्स आधार कार्डमधील महत्त्वाची माहिती जसे डेट ऑफ बर्थ, फोन नंबर, पता आणि इतर महत्वपूर्ण माहिती अपडेट करू शकणार आहेत.
हे अॅप आधार कार्ड अपडेट करण्याची प्रोसेस अधिक सोपी करणार आहे. यूजर्सना सरकारी ऑफीसमध्ये जाण्याची आणि बायोमॅट्रिक अथॉन्टिकेशन अपडेट करण्याची गरज नाही. या अॅपबाबत असं सांगितलं जात आहे की, हे नवीन अॅप AI ने सुसज्ज असणार आहे. याव्यतिरिक्त, ते आधारशी संबंधित माहिती अपडेट करण्यासाठी चेहऱ्याची ओळख तंत्रज्ञानाचा वापर करेल. आशा आहे की हे अॅप आधार अपडेट प्रक्रियेला गती देईल.
यूजर्सच्या पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा रेशन कार्डवरून आधार कार्डमध्ये जन्मतारीख आपोआप मिळवेल. ई-आधार अॅपच्या लाँचिंगबद्दल गेल्या अनेक महिन्यांपासून अपडेट येत आहेत. मात्र आतापर्यंत, UIDAI कडून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.
आधार कार्ड हरवले तर नवीन कसे मिळवायचे?
UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर किंवा mAadhaar अॅपवरून ई-आधार डाउनलोड केले जाऊ शकते.
आधार कार्डवरील नाव, पत्ता किंवा मोबाईल नंबर बदलता येतो का?
UIDAI च्या ऑनलाइन पोर्टलवर किंवा आधार केंद्रावर जाऊन आधार कार्डवरील नाव, पत्ता किंवा मोबाईल नंबर बदलू शकता.
Aadhaar PVC Card कसे मागवावे?
UIDAI च्या वेबसाइटवरून PVC आधार कार्ड मागवता येते.






