Vivo Pad 5e: मोठी स्क्रीन आणि दमदार बॅटरी! Vivo च्या नवीन टॅबलेटने बाजारात केली एंट्री
चीनी टेक कंपनी विवोने त्यांचा नवीन टॅब्लेट चीनमध्ये लाँच केलं आहे. हे नवीन डिव्हाईस Vivo Pad 5e या नावाने चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. 25 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटमध्ये कंपनीने त्यांचे नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन्स Vivo X300 आणि Vivo X300 Pro सादर करण्यात आला होता. स्मार्टफोन आणि टॅब्लेटशिवाय कंपनीने Vivo Watch GT 2 आणि TWS 5 देखील लाँच केले आहेत. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन टॅब्लेटमध्ये 12-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हे डिव्हाईस Snapdragon 8s Gen 3 चिपने सुसज्ज आहे आणि हे डिव्हाईस तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आले आहे.
Vivo Pad 5e डिव्हाईस 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज, 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज आणि 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. या डिव्हाईसच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 1,999 म्हणजेच सुमारे 25,000 रुपये, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,299 म्हणजेच सुमारे 29,000 रुपये, 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,599 म्हणजेच सुमारे 32,000 रुपये आणि 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,999 म्हणजेच सुमारे 37,000 रुपये ठेवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – X)
Vivo Pad 5e चा एक सॉफ्ट लाइट वर्जन देखील लाँच करण्यात आला आहे. ज्याच्या 8GB रॅम+128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,199 म्हणजेच सुमारे 27,000 रुपये आणि 8GB रॅम+ 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,499 म्हणजेच सुमारे 31,000 रुपये ठेवण्यात आली आहे. नवीन Vivo Pad 5e निळा, काळा आणि जांभळा रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. सॉफ्ट लाईट आवृत्ती निळा आणि काळा रंगात उपलब्ध असेल. Vivo Pad 5e ची विक्री 17 ऑक्टोबरपासून चीनमधील कंपनीच्या ऑनलाइन स्टोअरद्वारे सुरू होईल.
Vivo Pad 5e Android 15-बेस्ड OriginOS 5 वर आधारित आहे. या डिव्हाईसमध्ये 12.1-इंच डिस्प्ले आहे, जो 2.8K रेजोल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. Pad 5e हे डिव्हाईस Snapdragon 8s Gen 3 चिपने सुसज्ज आहे, ज्याला 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेजसह जोडण्यात आलं आहे. बेस व्हेरिअंटमध्ये LPDDR5X रॅम आणि UFS 3.1 इंटरनल स्टोरेज देण्यात आलं आहे.
Vivo च्या या नवीन टॅब्लेटमध्ये फोर-स्पीकर पॅनोरमिक ऑडियो सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये अनेक AI-बेस्ड टूल्स देण्यात आले आहेत. ज्यामध्ये AI ट्रांसक्रिप्शन, सर्कल टू सर्च, AI पीपीटी असिस्टेंट, मल्टी-स्क्रीन इंटरकनेक्शन, स्मॉल विंडो कोलॅबोरेशन आणि वायरलेस प्रिंटिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर Vivo Pad 5e मध्ये सिंगल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. जो सर्कुलर मॉड्यूलमध्ये देण्यात आला आहे. यामध्ये 8-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि फ्रंटला 5-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
Vivo Pad 5e मध्ये 10,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ज्याला 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. टॅब्लेटमध्ये USB Type-C पोर्ट आहे. हे वाय-फाय 6 आणि ब्लूटूथ 5.4 कनेक्टिव्हिटी देते. टॅबलेट चेहरा ओळखण्यास देखील समर्थन देतो. मानक मॉडेलचे माप 266.43×192×6.62 मिमी आहे आणि वजन अंदाजे 584 ग्रॅम आहे.