Vivo मार्केट गाजवणार! नव्या बजेट फोनमध्ये यूजर्सना मिळणार फ्लॅगशिपसारखा अनुभव, किंमत आणि फीचर्स वाचून व्हाल थक्क
Vivo Y37+ स्मार्टफोनच्या 8GB + 256GB व्हेरिअंटतची किंमत चीनमध्ये 1,599 युआन म्हणजेच सुमारे 21,400 रुपये आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक, ब्लू आणि सनराइज गोल्ड तीन कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Vivo Y37+ स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटवाला 6.74-इंच LCD डिस्प्ले देण्यात आली आहे. या स्मार्टफोनचे रेजोल्यूशन 1600 x 720 पिक्सेल आणि मॅक्सिमम ब्राइटनेस 1000 निट्स आहे. Vivo Y37+ हा लेटेस्ट विवो स्मार्टफोन मीडियाटेकच्या डायमेन्सिटी 6300 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोनमध्ये ग्राफिक्स सपोर्टसाठी Mali-G57 GPU देण्यात आला आहे. विवोने लाँच केलेल्या या फोनमध्ये 8GB LPDDR4X रॅम आणि 256GB चे UFS 2.2 स्टोरेज देण्यात आले आहे. या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये कंपनीने 8GB वर्चुअल रॅम फीचर सपोर्ट देखील दिला आहे. Vivo Y37+ स्मार्टफोन अँड्रॉईड 15 वर आधारित कंपनीच्या कस्टम इंटरफेस OriginOS 5 वर चालतो. विवोने हा फोन सुधारित सुरक्षा, यूजर फ्रेंडली इंटरफेस आणि इंटेलिजेंट अँटी-फ्राउड प्रोटेक्शन सारख्या वाढीव सुरक्षिततेसारख्या नवीनतम वैशिष्ट्यांसह लाँच केला आहे.
OpenAI चा मोठा धमाका! GPT-5.4 लाँच; आता AI स्वतः संगणक चालवणार, फोन आणि वेबवर सपोर्ट
फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर, Vivo Y37+ स्मार्टफोनमध्ये 13MP चा सिंगल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये नाइट, पोर्टेट, पेनोरमा आणि प्रो मोड सारखे फीचर्स देखील आहेत. विवो या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये दिलेला रिअर कॅमेरा 10x डिजिटल जूम आणि 1080 पिक्सेल रेजोल्यूशनला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5MP चा फ्रंट कॅमेरा सेंसर दिला आहे. Vivo Y37+ स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Vivo Y37+ स्मार्टफोनमध्ये डुअल सिम 5G, IR रिमोट कंट्रोल, साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि 3.5mm ऑडियो जॅकचा सपोर्ट देण्यात आला आहे.






