अहो iPhone नाही तर हा तर आहे Lava Shark! देशी स्मार्टफोन कंपनी करणार कमाल, अॅडव्हान्स फीचर्ससह येणार नवं डिव्हाईस
भारतातील स्मार्टफोन कंपनी Lava त्यांची नवीन Shark सीरीज लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीची ही स्मार्टफोन सिरीज सध्या प्रचंड चर्चेत आहे. कंपनी त्यांची नवीन स्मार्टफोन सिरीज Lava Shark 5G या नावाने लाँच करणार आहे. या स्मार्टफोनची डिझाईन आयफोनप्रमाणे असणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने Lava Shark 4G ही स्मार्टफोन सिरीज लाँच केली होती. त्यानंतर आता कंपनी Lava Shark 5G या स्मार्टफोन सिरीजवर काम करत आहे.
Moto ने उडवली सर्वांची झोप, बाजारात आणला प्रीमियम Foldable Smartphone! तब्बल इतकी आहे किंमत
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीची नवीन स्मार्टफोन सिरीज Lava Shark 5G अनेक नवीन अपग्रेडसह लाँच केली जाणार आहे. हा स्मार्टफोन फ्रेश डिजाइन आणि अधिक चांगली कनेक्टिविटीसह लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन कधी लाँच होणार, त्याची किंमत काय असणार आहे, याबाबत कोणतीही माहिती अद्याप अधिकृतपणे शेअर करण्यात आलेली नाही. मात्र अपकमिंग Lava Shark 5G स्मार्टफोनबाबतची काही माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
अपकमिंग Lava Shark 5G स्मार्टफोन ब्लू आणि गोल्ड रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. यापूर्वी Lava Shark 4G स्मार्टफोन देखील याच रंग पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला होता. रंग पर्याय सारखे असले तरी देखील या नवीन स्मार्टफोनच्या डिझाईनमध्ये कंपनी मोठा बदल करणार आहे, असं सांगितलं जात आहे. या आगामी स्मार्टफोनची डिझाईन आयफोनसारखी असणार आहे. या फोनच्या बॅक पॅनलमध्ये 5G चा लोगो देखील पाहायला मिळणार आहे. यासोबतच कंपनीने कॅमेरा मॉड्यूल देखील नवीन डिझाईनमध्ये लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे.
LAVA Shark 5g Launching Soon 🔥
Most Affordable 5G Mobile 📲 #LavaShark5G@LavaMobile @reachraina pic.twitter.com/OUsl6lpixC— Atul Tech ₿azaar 🇮🇳 (@Atulbazaar) May 15, 2025
Lava Shark 4G स्मार्टफोनमध्ये कंपनीने 50 मेगापिक्सलचा सिंगल कॅमेरा दिला होता. पण आता आगामी नवीन मॉडेलमध्ये डुअल कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. लावाच्या नवीन फोनचा कॅमेकरा मॉड्युल आयफोनसारखा असणार आहे. Lava Shark 5G बाबत असं सांगितलं जात आहे की, यामध्ये Unisoc T765 SoC असण्याची अपेक्षा आहे. अशी अपेक्षा आहे की, हा फोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह लाँच केला जाऊ शकतो. आगामी स्मार्टफोनच्या किंमतीबाबत अद्याप काही अपडेट शेअर करण्यात आले नाही. आगामी फोन अँड्रॉईड 15 वर आधारित असणार आहे. हा नवीन स्मार्टफोन 5जी कनेक्टविटीसह लाँच केला जाणार आहे.
Google मध्ये झाला बदलं, ‘Logo’ मधील G आयकॉनचा बदलला लूक! 10 वर्षांनंतर कंपनीचा मोठा निर्णय
या आगामी स्मार्टफोनच्या किंमतीबाबत अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही. हा स्मार्टफोन या महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला लाँच केला जाऊ शकतो. लावाच्या प्रोडक्ट लाइनकडे पाहता असे दिसते की हा फोन एक परवडणारा 5G डिव्हाइस असेल.