अखेर तो क्षण आलाच! गेल्या अनेक दिवसांपासून विवो युजर्स ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. विवोचा प्रिमियम सिरिजवाला अफोर्डेबल स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. अनेक दमदार फीचर्स आणि जबरदस्त स्पेसिफिकेशन्ससह या स्मार्टफोनने भारतात एंट्री केली आहे. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर या स्मार्ट
फोनचे टिझर शेअर केले जात होते. त्यामुळे हा स्मार्टफोन कधी लाँच होणार, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती. आता अखेर ही उत्सुकता संपली आहे. कारण विवोचा नवा अफोर्डेबल स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आल आहे.
विवोचा नवा अफोर्डेबल स्मार्टफोन Vivo X200 FE या नावाने भारतात लाँच करण्यात आला आहे. Vivo X200 FE स्मार्टफोन वीवोच्या सर्वात प्रीमियम स्मार्टफोन सीरीजमधील अफोर्डेबल स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन MediaTek चिपसेट आणि जबरदस्त कॅमेरा फीचर्सने सुसज्ज आहे. स्मार्टफोनमध्ये पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. वीवोच्या अफोर्डेबल प्रीमियम स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
Vivo X200 FE स्मार्टफोनच्या डिस्प्लेबद्दल बोलयाचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटवाला 6.31 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रेजोल्यूशन 2640×1216 पिक्सेल आहे. या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 5000 nit आहे. फोनमध्ये सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे.
वीवोच्या दमदार फोनमध्चे MediaTek Dimensity 9300+ चिपसेट देण्यात आाल आहे, जो दोन व्हेरिअंट 12GB रॅम + 256GB स्टोरेज आणि 16GB रॅम + 512GB स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. हा फोन Android 15 वर आधारित Funtouch OS 15 वर चालतो.
हा फोन IP68; IP69 रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे. ज्यामुळे हा फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहतो. हा स्मार्टफोन Luxe Grey, Amber Yellow आणि Frost Blue या तीन रंगाच्या ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनमध्ये 6500mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Vivo X200 FE स्मार्टफोनमध्ये डुअल 5G सिम सपोर्ट उपलब्ध आहे.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX921 आहे, ज्यासोबत 8MP चा वाइड अँगल लेंस आणि 50MP Sony IMX882 पेरिस्कोप लेंस देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या कॅमेऱ्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये स्नेपशॉट, पोर्टेट, फोटो, वीडियो, हाय रेजोल्यूशन, पॅनो, अल्ट्रा एचडी डॉक्यूमेंट, स्लो-मो, टाइम लॅप्स, सुपरमून, एस्ट्रो, प्रो, लाइव फोटो, पोर्टेट वीडियो, नाइट, ZEISS मल्टीफोकल पोर्टेट आणि माइक्रो मूव्ही सारखे फीचर्स उपलब्ध आहेत.
Vivo X200 FE स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, हा फोन 54999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. या Vivo फोनसाठी प्री-ऑर्डर सुरू झाल्या आहेत. या फोनची विक्री 24 जुलैपासून सुरू होईल.