Vivo X200 सिरीजमधील स्मार्टफोन्सवरून अखेर पडदा उठला! स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीसह समोर आले सर्व डिटेल्स
स्मार्टफोन कंपनी Vivo ने चीनमध्ये त्यांची Vivo X200 सिरीज लाँच केली आहे. या सिरीजमध्ये Vivo X200 Ultra आणि Vivo X200s या स्मार्टफोनचा समावेश आहे. विवोचे हे फ्लॅगशिप स्मार्टफोन गेल्या वर्षी लाँच झालेल्या X100 अल्ट्राची जागा घेणार आहेत. दोन्ही स्मार्टफोन प्रिमियम रेंजमध्ये लाँच करण्यात आले आहेत. स्मार्टफोनमध्ये पावरफुल प्रोसेसर देण्यात आला आहे. स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊया.
Vivo X200s चीनमध्ये CNY 4,199 म्हणजेच सुमारे 49,200 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. हा Vivo फोन जेन ब्लॅक, मिंट ब्लू, लैव्हेंडर आणि व्हाईट रंगाच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. त्याच्या प्री-ऑर्डर सुरू झाल्या आहेत आणि या स्मार्टफोनची पहिली विक्री 25 एप्रिल रोजी चीनमध्ये होणार आहे. Vivo X200 Ultra चीनमध्ये CNY 6,499 म्हणजेच सुमारे 76,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. हा फोन लाल, चांदी आणि काळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. त्याची पहिली विक्री 29 एप्रिल रोजी सुरू होईल.
Vivo X200 Ultra launched in China.
Price 💰 ¥6499 (₹76,020 $890, €782)specifications
📱 6.82″ 2K quad curved AMOLED LTPO display, 120Hz refresh rate, Armor glass protection
🔳 Qualcomm Snapdragon 8 Elite chipset
LPDDR5x RAM & UFS 4.0 storage
🎮 Adreno 830 GPU
🍭 Android 15
📸… pic.twitter.com/wAbItyX0Or— Abhishek Yadav (@yabhishekhd) April 21, 2025
Vivo X200 Ultra स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.82-इंचाचा QHD+ LTPO AMOLED डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे, जो HDR10+, Dolby Vision, 3168×1440 पिक्सेल रिझोल्यूशन, P3 वाइड कलर गॅमट, 93.3 परसेंट स्क्रीन टू बॉडी रेश्यो, HDR10+, आणि Dolby Vision ला सपोर्ट करेल.
Vivo X200 Ultra स्मार्टफोनमध्ये कंपनीने Snapdragon 8 Elite चिपसेट दिला आहे. ग्राफिक्स सपोर्टसाठी यामध्ये अॅड्रेनो जीपीयू देण्यात आला आहे. हा Vivo फोन 16GB LPDDR5x रॅम आणि 1TB UFS 4.1 स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 15 वर आधारित OriginOS कस्टम स्किनवर चालतो.
Vivo X200 Ultra स्मार्टफोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP आहे, जो OIS ला सपोर्ट करतो. यात 50MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 200MP पेरिस्कोपिक टेलिफोटो लेन्स आहे. सेल्फीबद्दल बोलायचे झाले तर, या विवो फोनमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा आहे. चांगल्या फोटोग्राफीसाठी, Vivo ने या फोनमध्ये VS1 AI आणि V3+ चिप दिली आहे.
Vivo च्या फ्लॅगशिप फोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे, जी 90W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 40W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेल्या कनेक्टिव्हिटी फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर, हा फोन 5G, 4G LTE, Wi-Fi 7, ब्लूटूथ 5.4, GPS आणि USB टाइप-C पोर्टला सपोर्ट करतो. फोनमध्ये इन-डिस्प्ले 3D ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर, IP68/IP69 रेटिंगचा सपोर्ट आहे.
Vivo X200s launched in China.
Price 💰 ¥4199 (₹49,116, $575, €505)Specifications
📱 6.67″ 1.5K flat OLED LTPS BOE Q10 display, 1600nits HBM, 120Hz refresh rate
🔳 MediaTek Dimensity 9400+
LPDDR5x RAM and UFS 4.0 storage
🎮 Immortalis G925 GPU
🍭 Android 15
📸 50MP Sony IMX921… pic.twitter.com/lH8kfBP1Wd— Abhishek Yadav (@yabhishekhd) April 21, 2025
Vivo X200s स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा FHD+ BOE डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2800 x 1280 पिक्सेल, आस्पेक्ट रेशो 20:9, ब्राइटनेस 5,000 निट्स आहे. या फोनचा स्क्रीन टू बॉडी रेशो 94.3 टक्के आहे. या फोनमध्ये इन-डिस्प्ले 3D ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
Vivo X200s फोनमध्ये MediaTek Dimensity 9400+ प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबतच, ग्राफिक्स सपोर्टसाठी या फोनमध्ये Immortalis-G925 GPU देण्यात आला आहे. हा Vivo फोन 16GB पर्यंत LPDDR5x रॅम आणि 1TB पर्यंत UFS 4.1 स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 15 वर आधारित OriginOS वर चालतो.
Vivo X200s मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 50MP मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे, त्यासोबत 50MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 50MP चा 3x टेलिफोटो लेन्स देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Vivo X200S स्मार्टफोनमध्ये 6200mAh बॅटरी आहे, जी 40W वायरलेस चार्जिंगसह 90W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.