BSNL VoWi-Fi नक्की आहे तरी काय? युजर्सना खराब नेटवर्कपासून मिळणार सुटका, आता कॉल ड्रॉप होण्याचं टेंशन नाही...
गेल्या काही काळापासून सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL सतत त्यांच्या युजर्ससाठी नवीन रिचार्ज प्लॅन घेऊन येत आहे. BSNL च्या रिचार्ज प्लॅन्सची खासियत म्हणजे या प्लॅन्सची किंमत कमी असते आणि यामध्ये असंख्या फायदे ऑफर केले जातात. कंपनी केवळ त्यांच्या युजर्ससाठी रिचार्ज प्लॅन्सच लाँच करत नाही तर नेटवर्क कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी देखील सतत प्रयत्न करत आहे. कंपनीने अलीकडेच नवीन टॉवर देखील लावले आहेत. याशिवाय कंपनीने काही शहरांत त्यांची 4G सर्विस देखील सुरु केली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे युदर्सना येणाऱ्या खराब नेटवर्कची समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. याचदरम्यान आता सरकारी टेलीकॉम कंपनीने त्यांच्या यूजर्ससाठी आता एका नवीन BSNL VoWi-Fi फीचरची टेस्टिंग देखील सुरु केली आहे.
तुमच्या शहरातील हवा किती विषारी? Google Maps वर असा पाहा रियल-टाइम AQI, काही सेकंदातच मिळणार अपडेट
कंपनीने सुरु केलेल्या या नवीन फीचरच्या मदतीने युजर्सना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. सहसा BSNL युजर्सना कमजोर मोबाइल नेटवर्कमुळे कॉल ड्रॉप किंवा वारंवार व्हॉईस ब्रेक होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे युजर्स वैतागतात आणि खराब नेटवर्कबाबत कंपनीकडे सतत तक्रार करतात. मात्र आता BSNL VoWi-Fi फीचर लाँच झाल्यानंतर जियो, एयरटेल आणि Vi प्रमाणेच बीएसएनएल देखील त्यांच्या युजर्सना वायफाय कॉलिंगची सुविधा देणार आहे. ज्यामुळे युजर्सना वारंवार कॉल ड्रॉप होण्याची किंवा व्हॉईस ब्रेक होण्याच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. बीएसएनएलची ही नवीन BSNL VoWi-Fi सर्विस नक्की काय आहे, त्याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
BSNL ची VoWi-Fi सर्विसबद्दल जर सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही सर्विस एक व्हॉईस ओव्हर वायफाय आहे, जी VoLTE वर आधारित आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने युजर्स त्यांच्या घरात किंवा ऑफीसमध्ये वायफाय नेटवर्कचा वापर करून कॉल करू शकणार आहेत. म्हणजेच जर तुमच्या फोनचे नेटवर्क खराब असेल आणि वायफायचे नेटवर्क चांगले असेल तरी देखील तुम्ही अगदी सहज कॉल करू शकणार आहात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी कॉल ड्रॉप होणार नाही तसेच आवाज देखील ब्रेक होणार नाही. ही सुविधा कमी नेटवर्क कव्हरेज असलेल्या भागात मोबाइल कॉलिंग सुधारण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही सुविधा केवळ अशा बीएसएनएल यूजर्ससाठी उपलब्ध असणार आहे, ज्यांच्याकडे बीएसएनएल 4जी सिम कार्ड आहे. कंपनीची ही नवीन सुविधा जुन्या 3जी किंवा 2जी सिमवर काम करणार नाही. बीएसएनएल आधीच देशभरात त्यांचे 4जी नेटवर्क वेगाने अपग्रेड करत आहे आणि यूजर्सना 4जी सिम अपग्रेड करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. कंपनी काही अटींच्या अधीन राहून मोफत सिम अपग्रेड देखील देत आहे.
Ans: सध्या सर्व ठिकाणी उपलब्ध नाही, टप्प्याटप्प्याने सेवा सुरू होते.
Ans: होय. पण प्रीपेड आणि पोस्टपेड सर्कलनुसार स्वतंत्र ऍक्टिवेशन लागते.
Ans: सध्या BSNL बहुतेक सर्कलमध्ये eSIM सेवा देत नाही.






