व्हॉट्सॲपवर मिळणार स्नॅपचॅटचे फिल्टर्स आणि इफेक्ट्स, लवकरच येतंय नवीन फीचर
लोकप्रिय मॅसेजिंग ॲप व्हॉट्सॲप त्यांच्या प्लॅटफॉर्ममध्ये सुधारणा करत अनेक नवीन फीचर लाँच करत आहे. आता व्हॉट्सॲप युजर्ससाठी स्नॅपचॅट सारखेच फिल्टर्स आणि इफेक्ट्स देखील घेऊन येणार आहे. व्हॉट्सॲप गेल्या काही महिन्यांपासून अशा फीचर्सवर काम करत आहे, जे स्नॅपचॅट सारखेच आहेत. आता कंपनी एकाच वेळी अनेक नवीन फीचर्सची चाचणी करत आहे जी पूर्णपणे स्नॅपचॅट सारखीच आहेत. रिपोर्टनुसार, कंपनी व्हॉट्सॲपमध्ये कॅमेरा इफेक्ट देण्याची तयारी करत आहे आणि त्याची टेस्टिंगही सुरू आहे.
हेदेखील वाचा- लवकरच लाँच होणार Samsung चा ट्रिपल फोल्ड स्मार्टफोन! Huawei ला देणार टक्कर
कंपनीने हे नवीन फीचर लाँच केल्यानंतर युजर्ससाठी व्हॉट्सॲपमध्ये अनेक कॅमेरा इफेक्ट्स उपलब्ध होणार आहेत. याशिवाय युजर्सना अनेक फील्टर्स देखील मिळणार आहेत. तसेच बॅकग्राऊंडचे पर्याय देखील मिळतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे युजर्स फोटो काढण्यासाठी या फील्टर्सचा वापर करू शकणार नाहीत. कारण हे फील्टर्स आणि ईफेक्ट्स व्हिडीओ कॉल दरम्यान उपलब्ध असणार आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
व्हॉट्सॲप फीचर ट्रॅकर WABetaInfo ने या नवीन फीचर्सबाबत अहवाल सादर केला आहे. हे फीचर अँड्रॉईडसाठी व्हॉट्सॲप बीटा आवृत्ती 2.24.22.10 मध्ये स्पॉट केले गेले आहे, जे सध्या प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. सध्या या नवीन फीचरवर कंपनी चाचणी करत असून हे फीचर काही निवडक युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आलं आहे. हे फीचर लवकरच सर्व व्हॉट्सॲप युजर्ससाठी उपलब्ध करून दिलं जाणार आहे. WABetaInfo ने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटच्या आधारे, हे नवीन फीचर ॲपच्या प्रायव्हसी सेटिंग्जमधून चालू किंवा बंद केले जाऊ शकते. सेटिंग्जमध्ये “Allow camera effects” नावाचा एक नवीन पर्याय दिसणार आहे, जो चालू किंवा बंद केला जाऊ शकतो.
हेदेखील वाचा- स्मार्टफोन युजर्ससाठी खुशखबर! OPPO India देतेय स्मार्टफोनच्या खरेदीवर 10 लाख रुपये जिंकण्याची संधी
हे नवीन फीचर प्रायवेसी सेटिंग्जमधून नियंत्रित केले जाऊ शकते, परंतु ते थेट कॅमेरा स्क्रीन आणि व्हिडिओ कॉल इंटरफेसवरून एक्टिवेट किंवा डिसेबल केले जाऊ शकते, ज्यामुळे वापरकर्त्यांना सहजपणे ईफेक्टचा एक्सेस मिळणार आहे.
ॲप आता युजर्सच्या सर्व चॅटचे रेकॉर्ड ठेवणार आहे. व्हॉट्सॲप लवकरच त्याच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चॅटबॉट Meta AI साठी Android वापरकर्त्यांसाठी एक नवीन फीचर आणू शकते. इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर एक नवीन “चॅट मेमरी” नावाचे फीचर जोडले जात आहे. ह्या नवीन फीचरमुळे युजर्सच्या सर्व चॅट्सचा रेकॉर्ड ठेवला जाईल, असं सांगितलं जात आहे.
एकदा माहिती चॅटबॉटच्या मेमरीमध्ये सेव्ह केल्यानंतर, वापरकर्त्यांना अधिक चांगला अनुभव मिळणार आहे. ॲपच्या नवीनतम बीटा आवृत्तीमध्ये हे वैशिष्ट्य दिसून आले आहे, परंतु सध्या ते बीटा युजर्ससाठी उपलब्ध आहे. मेटा एआय वापरकर्त्यांच्या खाजगी चॅट रेकॉर्ड करणार नाही, परंतु मेटा एआयला जे काही सांगितले जाईल, त्याचे संपूर्ण रेकॉर्ड असेल. अशा परिस्थितीत, पूर्णपणे नाही, परंतु त्याचा गोपनीयतेवर बऱ्याच प्रमाणात परिणाम होईल, कारण हे वैशिष्ट्य सुरू झाल्यानंतर, लोक Meta AI चा वैयक्तिक सहाय्यक म्हणून वापर करतील.