'या' स्मार्टफोन्सना मिळणार Android 16 अपडेट! लाइव्ह प्रोग्रेस इंडिकेटरपासून मल्टीटास्किंगपर्यंत मिळणार बरंच काही
टेक जायंट कंपनी गूगलने Google I/O 2025 ईव्हेंटचं आयोजन केलं आहे. या ईव्हेंटमध्ये अनेक नवीन डिव्हाईस लाँच केले जाण्याची शक्यता आहे. शिवाय आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजेच या ईव्हेंटमध्ये Android 16 अपडेट देखील रिलीज केलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा ईव्हेंट अँड्रॉईड युजर्ससाठी अतिशय खास असणार आहे. कंपनीने अद्याप याबात कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली, तरी अशी शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय Android 16 अपडेटचे काही फीचर्स देखील समोर आले आहेत.
Apple iPhone Update: Apple च्या फोल्डेबल iPhone बाबत समोर आली मोठी अपडेट, अशी असू शकते हटके डिझाईन
गुगलने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये Android 16 चा पहिला डेव्हलपर प्रिव्ह्यू रिलीज केला. यासोबतच, कंपनीने त्यांचा पहिला पब्लिक बीटा देखील लाँच केला आहे.आता लवकरच Android 16 अपडेट सर्व अँड्रॉईड युजर्ससाठी रिलीज केलं जाण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
अशी माहिती समोर आली आहे की, Android 16 अपडेट प्रथम गुगल पिक्सेल डिव्हाइसेसाठी रिलीज केले जाईल. यानंतर, सॅमसंग, वनप्लस, शाओमी, विवो आणि इतर स्मार्टफोन कंपन्या त्यांच्या युजर्ससाठी अपडेट आणतील. चला तर मग Android 16 अपडेट कोणत्या स्मार्टफोन्ससाठी रिलीज केलं जाणार आहे, याबाबत जाणून घेऊया.
लाईव्ह प्रोग्रेस इंडिकेटर: आता गुगल मॅप्स, उबर, स्विगी आणि इतर ट्रॅकिंग अॅप्ससाठी स्टेटस बारमध्ये लाईव्ह अपडेट्स दिले जाऊ शकतात. लाईव्ह प्रोग्रेस इंडिकेटर युजर्सना त्यांच्या ट्रिप किंवा ऑर्डरचे स्टेटस सहजपणे पाहण्याची परवानगी देईल.
फोल्डेबल स्मार्टफोनसाठी उत्तम मल्टीटास्किंग सपोर्ट: Android 16 फोल्डेबल स्मार्टफोनसाठी उत्तम मल्टीटास्किंग फीचरला सपोर्ट करेल. याद्वारे, युजर्स स्क्रीनवर एकाच वेळी दोन किंवा अधिक अॅप्स वापरू शकतील.
एडवांस प्राइवेसी आणि सिक्योरिटी अपडेट: Android 16 युजर्सच्या प्राइवेसीसाठी आणि सिक्योरिटीसाठी एक सँडबॉक्स प्रदान करेल. यासोबतच, आरोग्य डेटा साठवण्यासाठी एक नवीन सुविधा उपलब्ध होईल.
थर्ड-पार्टी कॅमेरा अॅप्समध्ये नाईट मोड: आता युजर्सना इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या अॅप्समध्येही नाईट मोडचा सपोर्ट मिळेल. यामुळे कमी प्रकाशात फोटोग्राफी आणखी चांगली होईल.
Apple ला टक्कर देण्यासाठी Google ची मोठी तयारी, अमेरिकेनंतर आता ‘या’ देशातही सुरु करणार रिटेल स्टोअर
बॅटरी लाइफ आणि परफॉर्मन्स सुधारणा: Android 16 बद्दलच्या अहवालांमध्ये असा दावा केला जात आहे की बॅकग्राउंडमध्ये चालणारे अॅप्स कमी बॅटरी वापरतील. यासोबतच, युजर्सना चांगले पॉवर मॅनेजमेंट मिळेल आणि ते जलद चार्जिंगला सपोर्ट करेल.