फोटो सौजन्य - Social Media
Netflix चे ओरिजिनल कॉन्टेन्ट जगभरात प्रचंड लोकप्रिय आहे. वेब सिरीज, चित्रपट आणि डॉक्युमेंटरीजमुळे Netflix ने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, अनेक युजर्सना एक गोष्ट नेहमी जाणवते. Netflix वरील व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्ड किंवा स्क्रीनशॉट का काढता येत नाही? विशेषतः स्वस्त प्लान घेतलेल्या युजर्सना कंटेन्ट जतन करून ठेवायची इच्छा असते, पण Netflix हे शक्य होऊ देत नाही. यामागे आहे Netflix ची अत्याधुनिक DRM (Digital Rights Management) टेक्नॉलॉजी. Netflix कडे सध्या जगभरात सुमारे ३० कोटी पेड सब्सक्राइबर्स आहेत. या सर्वांसाठी ही स्क्रीन-ब्लॉक टेक्नॉलॉजी तितक्याच प्रभावीपणे काम करते. स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू करताच Netflix वरील व्हिडिओ ब्लॅक स्क्रीनमध्ये बदलतो. त्यामुळे पायरेसी थांबवणे आणि ओरिजिनल कॉन्टेन्टचे संरक्षण करणे Netflix ला शक्य होते. याच कारणामुळे अनेक युजर्स महागडे प्लान घेण्यासही तयार होतात आणि Netflix आज जगातील आघाडीच्या OTT प्लॅटफॉर्मपैकी एक ठरतो.
Netflix कोणती टेक्नॉलॉजी वापरते?
Netflix स्क्रीन रेकॉर्डिंग रोखण्यासाठी Digital Rights Management (DRM) प्रणालीचा वापर करते. यामध्ये प्रामुख्याने तीन DRM टेक्नॉलॉजी वापरल्या जातात.
तांत्रिकदृष्ट्या हे कसे काम करते?
Android डिव्हाइसवर Netflix व्हिडिओ Encrypted स्वरूपात असतो आणि त्याचे Decryption फक्त Secure Hardware (TEE) मध्येच होते. व्हिडिओ थेट GPU किंवा Secure Video Path मधून प्ले केल्यामुळे स्क्रीन रेकॉर्डर अॅपला Raw Frame Access मिळत नाही.
तर iOS मध्ये व्हिडिओ मेमरी Safe Buffer Zone मध्ये ठेवली जाते, जी स्क्रीन रेकॉर्डरला दिसतच नाही.
Netflix ची DRM टेक्नॉलॉजी ही केवळ स्क्रीन रेकॉर्डिंग रोखण्यासाठी नाही, तर कंटेन्ट क्रिएटर्सचे हक्क जपण्यासाठी आहे. याच प्रगत सुरक्षेमुळे Netflix आजही पायरेसीपासून मोठ्या प्रमाणात सुरक्षित आहे आणि त्याचे ओरिजिनल कॉन्टेन्ट जगभरात विश्वासार्ह मानले जाते.






