iPhone 16e नको? आता करा या Android स्मार्टफोन्सची निवड! कॅमेरा, बॅटरी, परफॉर्मन्स... सर्वच परफेक्ट
Airtel Recharge Plan: कंपनीने कमी केले ‘या’ प्लॅन्सचे डेटा बेनिफिट्स, यूजर्स झाले नाराज! जाणून घ्या
OnePlus 13s स्मार्टफोन अशा यूजर्ससाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे, ज्यांना फ्लॅगशिप-लेवल स्पीड आणि स्मूद अनुभव पाहिजे आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.32-इंच LTPO AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1 बिलियन कलर्स सपोर्ट करतो. Snapdragon 8 Elite प्रोसेसरसह हा फोन मल्टीटास्किंग आणि गेमिंगमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड करत नाही. कॅमेरा सेटअपमध्ये डुअल 50MP सेंसर आणि 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे, जो सोशल मीडिया आणि व्हिडीओसाठी उत्तम आउटपुट देतो. या डिव्हाईसमध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5850mAh बॅटरी देण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुम्ही कॅमेऱ्याला प्राधान्य देत असाल तर Xiaomi 14 Civi तुम्हाला नाराज करणार नाही. या स्मार्टफोनमध्ये डुअल 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. जो सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगवेळी जबरदस्त डिटेल कॅप्चर करतो. रियरमध्ये 50MP + 50MP + 12MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Snapdragon 8s Gen 3 चिपसेट आणि HyperOS सह हा फोन परफॉर्मंस आणि फोटोग्राफी दोन्हीच्या बाबतीत यूजर्सना अतिशय चांगला अनुभव देतो.
आयफोनसारख्या दीर्घ सॉफ्टवेअर सपोर्टला महत्त्व देणाऱ्या यूजर्ससाठी Galaxy S24 हा सर्वात चांगला पर्याय ठरणार आहे. या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 7 वर्षांसाठी Android अपडेट्सस जारी केले जात आहेत. Exynos 2400 प्रोसेसर, ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि कॉम्पॅक्ट डिझाईनमुळे हा स्मार्टफोन प्रीमियम सेगमेंटमध्ये लोकप्रिय आहे. iPhone 16e सारखा विश्वसनीय अनुभव पाहिजे असणाऱ्या यूजर्ससाठी हा स्मार्टफोन सर्वात चांगली निवड आहे.
ज्यांना नैसर्गिक फोटो आणि क्लीन अँड्रॉईड अनुभव पाहिजे आहे, अशा यूजर्ससाठी Google Pixel 9a उत्तम निवड आहे. Google Tensor G4 चिपसेटसह फोनमध्ये AI फीचर्स आणि उत्तम कॅमेरा प्रोसेसिंग देण्यात आली आहे. 48MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 13MP चा अल्ट्रावाइड सेंसर iPhone 16e च्या फोटोग्राफीला जबरदस्त टक्कर देतो.
ज्यांना फास्ट चार्जिंग आणि पावरफुल हार्डवेयर पाहिजे आहे, त्यांच्यासाठी Realme GT 7 Pro बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. Snapdragon 8 Elite प्रोसेसर, 6500mAh बॅटरी आणि 120W चार्जिंगमुळे हा स्मार्टफोन अतिशय उत्तम परफॉर्मंस ऑफर करतो.
Ans: iPhone 16e ची सुरुवातीची किंमत भारतात अंदाजे ₹55,000–₹60,000 दरम्यान असू शकते (व्हेरिएंटनुसार बदल).
Ans: iPhone 16e मध्ये Apple A18 किंवा A17-based चिपसेट देण्यात आला आहे, जो दैनंदिन वापर आणि गेमिंगसाठी सक्षम आहे.
Ans: यामध्ये 48MP प्रायमरी कॅमेरा असण्याची शक्यता आहे, जो फोटो आणि व्हिडिओसाठी चांगली क्वालिटी देतो.






