इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन पद्धतीने झाला आहे. या परीक्षेत लातूर विभागीय शिक्षण मंडळातील जवळपास ११३ विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर टक्के गुण मिळवून राज्याच्या निकालात ‘लातूर पटर्न’चा आपला दबदबा कायम राखलाय. गेल्यावर्षी २०२४ मध्ये दहावीच्या परीक्षेत राज्यातील १८७ विद्यार्थ्यांपैकी लातूर विभागीय शिक्षण मंडळातील जवळपास १२३ विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवले होते. यंदाही या यशाची परंपरा कायम राखत लातूर विभागातील ११३ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवित आपले वर्चस्व कायम राखले आहे. या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या यशाचे श्रेय आई – वडिलांसह आपल्या शिक्षकांना दिले आहे.. तसेच शाळेत करून घेण्यात आलेल्या विशेष तयारीमुळे हे यश संपादन करता आल्याची भावना यशस्वी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.