रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ? विक्रेत्यानं चहाची भांडी थेट पावसाच्या घाण पाण्यात धुतली; किळसवण्याप्रकाराचा VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी रस्ते आणि खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. अशाच एका रल्वे स्थानकाच्या मुख्य प्लॅटफॉर्मच्या अगदी समोरही पाण्याचं तळं निर्माण झालं आहे. धक्कादायक म्हणजे एक व्यक्ती या दूषित दुर्गंधीयुक्त पाण्यात चहाची भांडी धुताना दिसत आहे. एका चहा विक्रेत्याने पाण्याचा तुटवडा किंवा सोयीसाठी थेट दुकानासमोर साचलेल्या घाणरेड्या पाण्यात आपली चहाची भांडी धुतलू आहेत. स्टेशन परिसरातील एका नागरिकाने हा व्हिडिओ रेकॉर्ड करत सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
आपने कई तरह की चाय पी होगी लेकिन नाले के पानी से धुली केतली और बर्तनों की चाय तो यकीनन नहीं पी होगी…. ये चाय मिलती है मुंबई के नालासोपारा में.. बाकी वीडियो देखिए..#Mumbai #Nalasopara pic.twitter.com/JoRyPJve3i — Kishor Joshi (@KishorJoshi02) July 10, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईला लागून असलेल्या नालासोपारा रेल्व स्थानकाबाहेरील हा प्रसंग आहे. हे रेल्व स्थानक अतिशय गजबजलेले असते. लाखो प्रवासी येथून ये-जा करतात. अनेक प्रवासी येथील स्टॉल्सवर चहा-नाश्ता करतात. आधीच पावसाळ्यात कावीळ, टायफॉईड, गॅस्ट्रो अशा आजारांचा धोका वाढलेला असतो. अशा संवेदनशील काळात थेट रस्त्यावर दूषित पाण्यात खाद्यपदार्थांची भांडी धुतली गेल्याने नागरिकांच्या आरोग्यविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अशा निष्काळजीपणा आणि बेजबाबदार विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी लोक करत आहेत. अशा लोकांमुळेच प्रमाणिकपणावरील विश्वास उडतो असे लोकांचे म्हणणे आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






