नितीश कुमार यांनी सम्राट चौधरी यांच्याबद्दल अशा प्रकारे बोलण्याची ही पहिली वेळ नाही. काही दिवसांपूर्वीच, कटिहारमधील एका कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या पाठीवर थाप मारली होती.
नीतीश कुमार हे राज्यसभेवर गेल्यानंतर बिहारच्या राजकारणामध्ये मोठे बदल होणार आहेत. नवीन मंत्रीमंडळामध्ये कोणाला संधी मिळणार आणि कोण मुख्यमंत्री होणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
नीतीश कुमार हे मुख्यमंत्री पद सोडून राज्यसभेच्या मार्गावर असल्याचे समोर आले आहे. यामुळे बिहारचे पुढचे मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सक्रिय राजकारणातील त्यांचे पुढचे पाऊल उघड केले आहे. परिणामी पाटणापासून दिल्लीपर्यंत राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे.
Nitish Kumar son : नितीश कुमार यांच्या प्रकृतीबाबत सुरू असलेल्या चिंतेनंतर आता त्यांचा मुलगा निशांत कुमार यांनी राजकारणात सक्रिय व्हावे अशी मागणी पक्षात जोर धरत आहे.
नितीश कुमार यांनी महिला डॉक्टरांसोबत केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागण्यात आले. यावर माफी मागणार का असा सवाल करण्यात आल्यावर त्यांनी पळ काढला.
बिहारमध्ये एका महिलेच्या अपमानाची विचित्र घटना घडली, डॉ. नुसरत परवीन त्यांचे प्रमाणपत्र घेण्यासाठी आल्या तेव्हा नितीश कुमार हसले आणि त्यांचा हिजाब ओढला. यावरुन वाद निर्माण झाला.
Nitish Kumar Viral Video: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये नितीश कुमार सार्वजनिक व्यासपीठावरील एका मुस्लिम महिलेच्या चेहऱ्यावरून हिजाब काढताना दिसत आहेत.
१८ व्या बिहार विधानसभेच्या शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी सभागृहामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. आमदार विभा देवी यांना शपथपत्र वाचता देखील आले नाही.
मागील सरकारच्या काळात विधानसभेचे अध्यक्षपद भाजपकडे होते, तर गृहखाते जेडीयूकडे होते. तथापि, यावेळी संपूर्ण समीकरण बदलले आहे. नितीश कुमार यांनी भाजपला गृहमंत्रिपद सोपवून त्यांची ताकद वाढवली आहे.
नितीश कुमार मुख्यमंत्री झाले असले तरी देखील बिहारच्या राजकारणात भाजपची पकड दिसून येत आहे. गुरुवारी नितीश कुमार यांच्यासोबत 26 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे.
महागठबंधनला यंदाच्या निवडणुकीत केवळ 35 जागा जिंकता आल्या. तेजस्वी यादव, राहुल गांधी यांच्या सभांना प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले. मात्र महागठबंधनच्या नेत्यांना गर्दीचे रूपांतर मतदानात करता आले नाही.
Nitish Kumar 10th time CM: निवडणूक तज्ञांच्या नकारात्मक भाकिते असूनही, नितीश कुमार अखेर १० व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले आणि बहुतेक मुख्यमंत्र्यांचा विक्रम प्रस्थापित केला.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दहाव्या कार्यकाळासाठी शपथ घेणार आहेत. गांधी मैदानावर होणाऱ्या या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि १६ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
Nitish Kumar : नितीश कुमार हे बिहारचे पुढचे मुख्यमंत्री असतील. एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांचे नाव निश्चित झाले आहे. २० नोव्हेंबर रोजी नितीश कुमार १० व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.