नितीश कुमार यांनी 10 व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे (फोटो - एक्स)
बिहारमध्ये एनडीए आघाडीमध्ये नितीश कुमार हेच मोठे भाऊ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नितीश कुमार यांनी दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याबाबत नितीश कुमार यांनी हा विक्रम रचला. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहिले आहेत. महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये देखील तिघांची आघाडी राहिली आहे. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असेच त्रिसुत्र बिहारमध्ये राहणार आहे. सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा या दोघांकडे उपमुख्यमंत्रीपद राहणार आहे. त्यामुळे बिहारमध्येही महाराष्ट्र पॅटर्न राबवला गेला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सरकार स्थापनेमध्ये बिहारमध्येही ‘महाराष्ट्र पॅटर्न’
बिहार विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रामध्ये देखील महायुतीचे बहुमताने सरकार आल्यानंतर एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा शपथविधी पार पडला. महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाला महाराष्ट्रात 57 जागा जिंकता आल्या, तर भाजपने 132 जागांवर विजय मिळवला होता. तर अजित पवार गटाने 41 उमेदवारांचा विजय झाला होता. यामुळे महाराष्ट्रामध्ये भाजपच मोठा ठरला. त्यामुळे मुख्यमंत्री पदाची धुरा ही भाजपकडे आली. तर बिहारमध्ये नितीश कुमार हेच गेंमचेंजर ठरले. एनडीएमधील 243 जागांपैकी भाजप आणि जेडीयूने प्रत्येकी 101 जागा जिंकल्या आहेत, तर लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) ने 29, हिंदुस्थानी अवाम मोचनि 6 आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक मोचनि 6 जागा जिंकल्या आहेत.
नितीश कुमार यांच्यासह आणखी इतर नेत्यांनी देखील मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांची नावे खालीलप्रमाणे
Ans: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीए आघाडीने विजय मिळवण्यानंतर नितीश कुमार हे मुख्यमंत्री बनले
Ans: नितीश कुमार यांनी बिहारचे 10 वेळा मुख्यमंत्री होऊन नवा विक्रम रचला आहे.






