बदलापूरात महाविकास आघाडीने जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी पाकिस्तानचा झेंडा असलेले फोटो आंदोलकांकडुन जाळण्यात आले आणि जोरदार घोषणाबाजी करत या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. बदलापूर पश्चिम येथील साईकृपा हॉस्पिटल जवळ महाविकास आघाडीच्या वतीने हे तीव्र आंदोलन करण्यात आल. तर या दहशतवादी हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. तसेच भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहन्यासाठी देशाचे गृहमंत्री जातात तेव्हा त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकण्यात येत ही शरमेची बाब असल्याची टीका महाविकास आघाडीच्या पदाधिकऱ्यांनी केली. तर आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.