भंडारा: भंडाऱ्यातून एक धक्कदायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. फेसबुकवर मैत्री करणं एका तरुणीला खूपच महागात पडलं आहे. फेसबुकवरती ओळख झाल्यानंतर मैत्री झाल्यानंतर गुंगीचं औषध देत तरुणीवर दोघांनी अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
भंडारा जिल्ह्यातील २२ वर्षीय पीडित तरुणी हिची आरोपी तरुणाशी फेसबुकवर ओळख झाली. आरोपी आणि पीडित हे भंडारा शहरालगत असलेल्या एका गावातील आहेत. आरोपी तरुण हे दोघेही मित्र असून त्यांनी पीडितेला देसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तिच्याशी मैत्री केली. त्यांनतर २० सप्टेंबरला आरोपींनी तिला भेटायला बोलावले. आरोपींनी पीडितेला गुंगीचं औषध दिलं. यांनतर तिला तिच्या घरी पोहोचवून देण्याच्या बहाण्याने गावालगत असलेल्या कॅनल मार्गावरील निर्जनस्थळी नेत एकानं बळजबरीनं अत्याचार केला. त्यानंतर दुसर्याने तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बळजबरीचा प्रयत्न केला.
पीडित तरुणीने ओपींच्या तावडीतून कशीबशी स्वतःची सुटका करून घर गाठलं. यानंतर भंडारा पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या दोघांना आता अटक केली आहे. प्रज्वल पांडे (27) आणि मोहित बांते (29) असं पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचं नावं आहेत. पोलिस या प्रकरणी सखोल तपास करत असून आरोपींना न्यायालयात हजार करण्यात येणार आहे.
आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, वारंवार अत्याचार केला, अल्पवयीन मुलगी गर्भवती आणि…
भंडाऱ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. यात ती गर्भवती राहिल्याचं देखील समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी १९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
भंडाऱ्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला विविध प्रलोभन देत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचं समोर आलं आहे. यात ती गर्भवती राहिली. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात आली. मात्र समाजात बदनामी होईल या भीतीपोटी त्यांनी पोलिसात तक्रार दिली नाही. याची माहिती होताच भंडारा ठाण्याचे पोलीस निरिक्षधक उल्हास भुसारी यांनी पुढाकार घेत कुटुंबीयांना विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून भांडारा पोलिसांनी आरोपी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव वेदांत हिवराज आडवे (19) असे आहे.
Crime News: अकलुजमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 13 गुन्हेगारांविरूध्द थेट MCOCA…