Jalna Crime: आईचा अपमान ठरला जीवघेणा; दगडाने ठेचून मित्राची हत्या, 8 तासांत आरोपींचा पर्दाफाश
काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील मृत महिलेचे नाव माधुरी अंबादे (३२) असे आहे. गौरव अंबादे (२५) असं आरोपीचं नावं आहे. आरोपी आणि मृत महिला हे दोघेही चंद्रपूरच्या
ब्रम्हपुरीचे आहेत. भंडारा जिल्ह्यातील पालांदूर इथं एका विवाहासाठी हे आले होते. भागडी गावातील नातेवाईकांकडे रात्री मुक्कामी होते. रात्री दोघांमध्ये लग्नाच्या मुद्द्यांवरून वाद झाला, यावेळी वहिनीने लग्नास नकार दिल्यानंतर दीर गौरवने तिची हत्या केली. बाजूला झोपलेल्या मुलीला जाग आली तिने आरडाओरडा केल्यानं आरोपी गौरव अंबादे याने घटनास्थळावरून दुचाकीनं पळ काढला.
पोलीस तपास सुरु
या प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येतं आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून प्रेमसंबंधातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आला. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत असून या घटनेचा तपास करत आहे.
हृदयद्रावक घटना! एसटी बसने दुचाकीला धडक, वडील आणि 3 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
भंडारा येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याचे समोर आले आहे. ही धडक एवढी भीषण होती दुचाकीवरील बाप-लेकाचा घटनास्थळी मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिकांनी धाव घेत पोलिसांनाही पाचारण केले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना भंडारा येथील एसटी डेपो परिसरात घडली.
कसा झाला अपघात
भंडारा शहरातील एसटी डेपोच्या आवारात रात्री साडेसात वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नावे रोहित खेडकर (३०) आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा रौनक खेडकर असे आहे. रोहित यांचा पाण्याचा आरो प्लांटचा व्यवसाय आहे. ते भंडारा शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करतात. खाली झालेली पाण्याची कॅन आणण्यासाठी बापलेक दुचाकीनं एसटी डेपोत गेले होते. याचवेळी एसटी बसने दुचाकीला धडक दिली, यात दोघांचाही घटनास्थळीचं मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच शहरातील शेकडो नागरिक घटनास्थळी आणि शासकीय रुग्णालयात जमा झाले होते. यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त एसटी डेपो परिसरात तैनात करण्यात आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
Ans: लग्नास नकार दिल्यामुळे वाद झाला आणि त्यातून हत्या झाली.
Ans: भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील भागडी गावात.
Ans: आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.






