चंदगड तालुक्यामध्ये देखील वन्य प्राण्यांनी धूडगूस घातला असून आज हत्तीने गावामध्ये तळ ठोकला आहे. वन विभागाचे अधिकारी आणि त्या कर्मचारी हत्तीला वनक्षत्रात पाठविण्यासाठी सकाळ पासून प्रयत्न करत आहेत.
घरात आवश्यक असणाऱ्या पैकी एक म्हणजेच लाल मिरचीची चटणी आणि त्यात पाहिजे असणारा मसाला. लग्नसराईचे हंगाम, अनेक वर्षांनी होणारी महालक्ष्मी देवीची यात्रा यामुळे मिरची आणि मसाला दर वाढले आहेत.
चंदगड तालुक्यातील अनेक गावांमध्ये वारकरी सांप्रदाय वाढत चालला असला तरी अलीकडच्या काळामध्ये प्रवचन- कीर्तनकार आणि पखवाज वादक, गायक, साथीदार यांच्या हजारो रुपयांच्या पाकिटाच्या मागणीमुळे दिवसेंदिवस व्यावसायिक स्वरूप दिसून येत आहे.