चंदगड : घरात आवश्यक असणाऱ्या पैकी एक म्हणजेच लाल मिरचीची चटणी आणि त्यात पाहिजे असणारा मसाला. लग्नसराईचे हंगाम, अनेक वर्षांनी होणारी महालक्ष्मी देवीची यात्रा यामुळे मिरची आणि मसाला दर वाढले अाहेत. दरवाढीने सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात पाणी आले आहे. सध्या बाजारपेठेत मिरची खरेदीसाठी महिलांची लगबग सुरू आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात दर वाढ झाली आहे. त्यामुळे लाल मिरचीच्या तिखटाचा ठसका सोसवेनासा झाला आहे.
मिरची पिकावर अनेक रोगामुळे उत्पादनात मोठी घट होते. अवकाळी पाऊस आणि हवामानाचा बदलामुळे मिरची पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात घट होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. कमी उत्पादनामुळे आणि दर्जेदार मिरचीला मागणी असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही.
शेतकऱ्यांची फसवणूक
व्यापारी वर्गाकडून सामान्य शेतकऱ्यांची फसवणूक होते. आता लग्न आणि यात्रेचे दिवस असल्याने मिरचीला मोठी मागणी असून दरात मोठी वाढ झाली आहे. नागनवाडी, चंदगड, अडकूर, कोवाड, तुर्केवाडी, माणगाव, कानूर, हेरे आदी बाजारपेठेत मिरची खरेदीसाठी सर्वत्र गर्दी होत आहे.
मिरचीचे दर
संकेश्वरी १५००-२५००रुपये
काश्मिरी-९००-११५०
केडीएल बेडगी- ८५०-१२००
सिजेंटा- ७००-८५०
तेजा- ३५०-४२५
देशी- ४००-५५० गुटुर -३५०-४००
चपटी-३००-३५०