चंदगड तालुक्यातील चिंचणे,कामेवाडी,कुदनुर,कितवाड, कालकुंद्री आदी भागात टस्कर हत्तीची दहशत असून शेतकरी भयभीत झाले आहेत. सध्या उसाचे कारखाना सुरू असून चार-पाच कारखान्याचे ऊस तोडणी कामगार उसाच्या फडातून तोडणी करत आहेत. त्यामुळे उसात जायचे कसे असा प्रश्न कामगाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. ग्रामस्थ आणि कामगार झाले आहेत वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी हत्तीला वनक्षत्रात पाठविण्यासाठी सकाळ पासून प्रयत्न करत आहेत.