डिजिटल अरेस्टची भीती घालून 11 कोटींचा गंडा (सौजन्य : iStock)
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे फसवणूक होत आहे. त्यातच आता कोल्हापुरात मोठी घटना समोर आली आहे. डिजिटल अरेस्टची भीती घालून सम्राटनगर येथील निवृत्त प्राध्यापिका आणि देवकर पाणंद येथील निवृत्त अभियंत्याला 11 कोटींचा गंडा घालण्यात आला.
पुण्यासह धाराशिव येथील 5 सायबर चोरट्यांना राजारामपुरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सायबर भामट्यांच्या रॅकेटमधील मुंबई, नाशिक व नागपूर येथील काही संशयितांची नावे निष्पन्न होत आहेत. बंडू हरिबा राठोड (वय ३७, रा. यशवंतनगर, अंबेठाणरोड चाकण, पुणे, मूळ गाव तुगाव, ता. उमरगा, जि. धाराशिव), तेजस राहुल भालेराव (वय २१, रा. खोरवडे, ता. दौंड), विवेक ऊर्फ विकी भास्कर गवळी (वय २८, रा. शिवमल्हार हौसिंग सोसायटी, तळवडे निगडी, जि. पुणे), अक्षय रमेश कामठे (वंय ३०, रा. शिव तारादत्त हौसिंग सोसायटी सासवड, ता. पुरंदर, पुणे), क्षितिज चंद्रकांत सुतार (वय २४, रा. गणेश गार्डन अपार्टमेंट, वडगाव बुद्रुक, पुणे) अशी संशयितांची नावे आहेत.
हेदेखील वाचा : Shaktieeth Expressway: ‘शक्तिपीठ’ महामार्गावरून राजकारण तापलं; फडणवीसांच्या प्रकल्पावरून कोल्हापुरात तणाव
दरम्यान, संशयितांच्या बँक खात्यांवरील 48 लाख रुपये गोठविण्यात आले. संशयित क्षितिज सुतार हा टोळीचा प्रमुख सूत्रधार असल्याचेही सांगण्यात आले. सुतार हा ऑनलाईन फसवणुकीचे नेटवर्क नियंत्रित करत होता. संशयितांनी पुण्यासह अन्य ठिकाणच्या हॉटेलमधील खोलीत न्यायालय आणि पोलिस अधिकार्यांच्या कार्यालयाचा सेटअप तयार केला होता, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे.
संशयितांच्या कारनाम्यांची घेतली माहिती
फसवणुकीतील रक्कम बंडू राठोडच्या खात्यावर जमा करण्यात येत होती. त्यानंतर संबंधित रक्कम पुढे अन्य खात्यांवर वर्ग करण्यात येत होती, अशी माहिती चौकशीतून पुढे येत आहे. मुंबई, पुणे व नागपूर सायबर क्राईम सेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजारामपुरी व जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील तपास अधिकाऱ्यांची भेट घेऊन संशयितांच्या कारनाम्यांची माहिती घेतली आहे.
हेदेखील वाचा : MNS Morcha: मुंबईत पुन्हा परप्रांतीय रिक्षाचालकाची मुजोरी; तरूणाला हिंदी भोजपूरी बोलण्यास जबरदस्ती
डिजिटल अरेस्टसाठी तयार केलं चक्क बनावट कोर्ट
स्कॅमर्स लोकांकडून पैसे उकळण्यासाठी नवीन पद्धती शोधत आहेत. यातीलच एक पद्धत म्हणजे डिजीटल अरेस्ट. आतापर्यंत डिजीटल अरेस्टची अनेक प्रकरण समोर आली आहे. या प्रकरणांमध्ये स्कॅमर्स खोटे पोलीस ऑफीसवर बनवून लोकांना फसवतात. त्यांच्यावर खोटे आरोप करतात आणि पैसे उकळतात. आता समोर आलेल्या प्रकरणामुळे सर्वचजण हादरून जाणार आहेत. जयपुरच्या मानसरोवर परिसरात डिजीटल अरेस्टची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यावेळी स्कॅमर्सनी वृद्धाला फसवण्यासाठी चक्क बनावट कोर्ट तयार केलं आहे.