१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने नुकत्याच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत शानदार कामगिरी केली. त्याचा फॉर्म पाहून भारताचा दिग्गज माजी फिरकीपाटू रविचंद्रन अश्विन देखील अवाक झाला आहे.
भारत १९ वर्षांखालील आणि दक्षिण आफ्रिका १९ वर्षांखालील यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत शेवटचा सामना जिंकून भारताने दक्षिण आफ्रिकेला मालिकेत ३-० असे पराभूत केले.
दुसरा सामना ५ जानेवारी रोजी खेळला गेला. या सामन्यात भारताने शानदार कामगिरी केली आणि विजय मिळवला. वैभव सूर्यवंशीने धमाकेदार अर्धशतक झळकावून भारताला सामना जिंकण्यास मदत केली.
निवड समितीने ३ जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी वैभव सूर्यवंशीची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. आयुष विश्वचषकात भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे नेतृत्व करेल.