• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Supporters Of The Winning Candidates Celebrated In The Bhosari Area

भोसरी परिसरात विजयाचा गुलाल; ढोल-ताशांच्या गजरात अन् दुचाकी रॅलीने परिसर दणाणला

विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी भोसरी गावठाण ते इंद्रायणीनगरपर्यंत गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि दुचाकी रॅली काढत संपूर्ण परिसर पिवळा-भगवामय करून टाकला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 17, 2026 | 12:34 PM
भोसरी परिसरात विजयाचा गुलाल; ढोल-ताशांच्या गजरात अन् दुचाकी रॅलीने परिसर दणाणला

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भोसरी परिसरात विजयाचा गुलाल
  • दुचाकी रॅलीने परिसर दणाणला
  • बुलेट रॅली आणि ‘साऊंड’चा धडाका
पिंपरी : भोसरी, दिघी आणि इंद्रायणीनगर परिसरात निवडणुकीच्या निकालांनंतर विजयाचा महासंग्राम पाहायला मिळाला. सकाळपासून लागलेल्या निकालांच्या चुरशीनंतर, दुपारी चित्र स्पष्ट होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी भोसरी गावठाण ते इंद्रायणीनगरपर्यंत गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि दुचाकी रॅली काढत संपूर्ण परिसर पिवळा-भगवामय करून टाकला.

दोन केंद्रांवर रंगली निकालाची उत्सुकता

भोसरीतील निवडणुकीसाठी दोन मुख्य ठिकाणी मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली होती. प्रभाग क्रमांक ३, ४, ५ व ७ ची मतमोजणी भोसरी गावठाणातील बापुजी बुवा चौक येथील कबड्डी प्रशिक्षण केंद्रात पार पडली. तर, प्रभाग क्रमांक २, ६, ८ आणि ९ ची मतमोजणी इंद्रायणीनगरातील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात पार पडली. सकाळी ८ वाजेपासूनच या दोन्ही केंद्रांच्या बाहेर उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. प्रा. रामकृष्ण मोरे कमान परिसर तर कार्यकर्त्यांच्या गर्दीने पूर्णतः ओसंडून वाहत होता.

दुपारनंतर उत्साहाचे वातावरण

सकाळच्या सत्रात निकालांची धाकधूक होती, मात्र दुपारी दोननंतर जसजसे विजयाचे आकडे स्पष्ट होऊ लागले, तसा कार्यकर्त्यांचा संयम सुटला आणि जल्लोषाला सुरुवात झाली. विजयाचे अधिकृत प्रमाणपत्र घेण्यासाठी उमेदवार जेव्हा केंद्राबाहेर आले, तेव्हा कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून धरले. “कोण आला रे कोण आला…” आणि पक्षांच्या जयघोषाने परिसर निनादला. भंडाऱ्याची उधळण आणि गुलालाच्या रंगात कार्यकर्त्यांचे चेहरे न्हाऊन निघाले होते.

बुलेट रॅली आणि ‘साऊंड’चा धडाका

विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी तरुणाई मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरली होती. शेकडो दुचाकींच्या रॅलीने भोसरीतील मुख्य रस्ते व्यापले होते. विशेषतः बुलेट गाड्यांच्या फटाक्यांच्या आवाजाने आणि सायलेन्सरच्या आवाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हातात पक्षाचे झेंडे घेऊन निघालेल्या या रॅलीमुळे काही काळ वाहतुकीची संथ गती झाली होती.

हे सुद्धा वाचा : पुण्यात भाजपने शतक ठाेकले, राष्ट्रवादीला धाेबीपछाड; ‘हे’ दिग्गज नेते पराभूत

राजकीय सलोखा आणि रंगांची उधळण

बापूजी बुवा चौकात एकीकडे भाजप तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. दोन्ही बाजूंनी विजयाचा जल्लोष सुरू होता. मात्र, कोणताही वाद न घालता दोन्ही बाजूंच्या समर्थकांनी आपापल्या उमेदवारांच्या विजयाच्या घोषणा देत मिरवणुका पुढे नेल्या. पिवळा, भगवा आणि गुलाबी अशा विविध रंगांच्या उधळणीमुळे भोसरीचा परिसर अक्षरशः रंगीबेरंगी झाला होता.

Web Title: Supporters of the winning candidates celebrated in the bhosari area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 12:34 PM

Topics:  

  • BJP
  • Election News
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections
  • PCMC Election 2026

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड महापालिका विषय समित्यांमध्ये ‘जुन्या-नव्यां’चा संगम; तिन्ही मतदारसंघांचे राजकीय समीकरण साधले
1

पिंपरी-चिंचवड महापालिका विषय समित्यांमध्ये ‘जुन्या-नव्यां’चा संगम; तिन्ही मतदारसंघांचे राजकीय समीकरण साधले

ठाकरेंच्या शब्दाला किंमत उरली नाही, उबाठातील सर्व निर्णय…; भाजपच्या नेत्याची टीका
2

ठाकरेंच्या शब्दाला किंमत उरली नाही, उबाठातील सर्व निर्णय…; भाजपच्या नेत्याची टीका

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?
3

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेत भाजपचा गटनेता कोण? ‘या’ सदस्यांची नावे चर्चेत
4

Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेत भाजपचा गटनेता कोण? ‘या’ सदस्यांची नावे चर्चेत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Shukra Gochar 2026: शुक्र राशी बदलणार, या राशीच्या लोकांचे बदलणार नशीब

Shukra Gochar 2026: शुक्र राशी बदलणार, या राशीच्या लोकांचे बदलणार नशीब

Mar 07, 2026 | 07:05 AM
Be Heard Day: शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांसाठी खास दिवस; वाचा नॅशनल बी हर्ड डे निमित्त 10 ‘लो-बजेट’ मार्केटिंग मंत्र

Be Heard Day: शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांसाठी खास दिवस; वाचा नॅशनल बी हर्ड डे निमित्त 10 ‘लो-बजेट’ मार्केटिंग मंत्र

Mar 07, 2026 | 06:30 AM
Maruti Suzuki च्या ‘या’ कार्स लक्षात ठेवा! मार्च 2026 मध्ये ‘या’ दिवशी मिळू शकतो छप्परफाड डिस्काउंट

Maruti Suzuki च्या ‘या’ कार्स लक्षात ठेवा! मार्च 2026 मध्ये ‘या’ दिवशी मिळू शकतो छप्परफाड डिस्काउंट

Mar 07, 2026 | 06:15 AM
Plant Power Day 2026 : घराचं नंदनवन आणि शरीराचं इंधन! वनस्पती ऊर्जा दिनी जाणून घ्या शरीर डिटॉक्स करण्यासाठी ‘हे’ 5 गुप्त उपाय

Plant Power Day 2026 : घराचं नंदनवन आणि शरीराचं इंधन! वनस्पती ऊर्जा दिनी जाणून घ्या शरीर डिटॉक्स करण्यासाठी ‘हे’ 5 गुप्त उपाय

Mar 07, 2026 | 05:30 AM
शालेय वाहतूक नियमांच्या तपासणीसाठी राज्यभर विशेष मोहीम राबविणार! मंत्री दादाजी भुसे यांचा निर्णय

शालेय वाहतूक नियमांच्या तपासणीसाठी राज्यभर विशेष मोहीम राबविणार! मंत्री दादाजी भुसे यांचा निर्णय

Mar 07, 2026 | 04:16 AM
क्रूरतेला सीमा नाही! अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून मनोरूग्ण महिलेला थेट…

क्रूरतेला सीमा नाही! अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून मनोरूग्ण महिलेला थेट…

Mar 07, 2026 | 02:35 AM
राज्यसभा निवडणुकीसाठी सामाजिक समीकरणांची सांगड; भाजपचे उमेदवार निवडीतून राजकारण

राज्यसभा निवडणुकीसाठी सामाजिक समीकरणांची सांगड; भाजपचे उमेदवार निवडीतून राजकारण

Mar 07, 2026 | 01:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM
Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Mar 06, 2026 | 07:41 PM
Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:36 PM
Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Mar 06, 2026 | 07:20 PM
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.