छत्रपती संभाजीनगर येथील नाथ स्कूल ऑफ बिझनेस अँड टेक्नॉलॉजी (NSBT) या संस्थेच्या पाच विद्यार्थ्यांनी नुकतीच तीन आठवड्यांची शैक्षणिक अभ्यासदौरा जपानमधील फुकुशिमा शहरात पूर्ण केली. भूकंपाने बाधित या भागातील पुनर्बांधणी प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी त्यांनी उद्योग क्षेत्रातील नेते, सरकारी अधिकारी तसेच स्थानिक समाजाशी संवाद साधला.या अभ्यासदौऱ्यात विद्यार्थ्यांनी जपानी संस्कृती, प्रशासन, तसेच व्यवस्थाभिमुखतेचा सखोल अभ्यास केला. विशेष म्हणजे, दोन छोट्या शहरांमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि व्यवस्थापन शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानवाढीसाठी केलेली ही पहिलीच अनोखी भेट ठरली आहे.