सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीला दोन दिवसात झालेल्या तथ्यहिन व बदनामीकारक चर्चांमुळे प्रचंड मानसिक त्रास झाला. ‘या बदनामीला जबाबदार कोण’ असा प्रश्न तिने गुन्हे शाखेच्या पोलिसांना विचारला आहे. दरम्यान गुन्हे शाखेने आतापर्यंत झालेला तपासाची माहिती घेतली. तसेच पुढील दिशा देखील ठरवली आहे.
स्वारगेट बसस्थानकात (दि. २५ फेब्रुवारी) पहाटे एका सराइत गुन्हेगाराने बसमध्ये तरुणीवर अत्याचार केला. या प्रकरणात स्वारगेट पोलिसांत गुन्हा दाखल आहे. प्रकरण समोर आल्यानंतर तीन दिवसांनी आरोपीला पकडले. मात्र दुसऱ्याच दिवशी पीडित तरुणीबाबत तथ्यहिन चर्चा झाली. सोशल मीडियावर त्याबाबत चर्चा झाली. तसेच आरोपीचे वकिल व काही नेत्यांनी देखील जाहीर बोलले गेले.
दरम्यान गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे आला आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेने आतापर्यंत झालेला तपासाची माहिती घेतली. तर तरुणीची देखील भेट घेतली. तेव्हा तिने पोलिसांकडे तिच्या मनातील खदखद व्यक्त केली. पीडित मुलीशी दोन ते अडीच तास चर्चा केली. या चर्चेदरम्यान, पीडित मुलीने पोलिसांना विविध प्रश्न विचारले.
महिला अधिकाऱ्याच्या क्रमांकावर तक्रार
स्वारगेट पोलिसांनी घटनेच्या दिवशी आरोपीची माहिती मिळविण्यासाठी जाहीर केलेल्या महिला अधिकाऱ्याच्या मोबाइलवर एका अनोळखी महिलेने संपर्क साधून आरोपीने तिच्यासोबत केलेल्या गैरकृत्याची माहिती दिली होती. स्वारगेट पोलिसांनी संबंधित महिलेला तक्रार देण्यासाठी बोलावले होते. मात्र, त्या महिलेने बदनामीच्या भितीने तक्रार दिली नाही.
12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी
मागील आठवड्यात पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाला होता. या अत्याचारानंतर संबंधित आरोपी हा घटनास्थळावरून पळून गेला होता. पोलिसांत तक्रार येताच गुन्हा दाखल करत पोलिसांची विविध पथके त्याच्या मागावर होती. अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. पुणे पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला अटक केली आहे. कोर्टाने त्याला 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. कोठडीत असलेला आरोपी दत्तात्रय गडेची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. त्यामध्ये अनेक बाबी समोर येत आहेत. चौकशीतून एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने पोलिसांचा गणवेश परिधान केल्याचा फोटो पोलिसांना मिळाला आहे. त्यामुळे या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. आरोपीच्या मोबाईलचे विश्लेषण पोलिसांनी केले आहे. पुण्यातील शिवाजीनगर , स्वारगेट, शिरूर, अहिल्यानगर, सोलापूर बसस्थानकात वावर असल्याचे समोर आले आहे. तसेच आशा प्रकारचे आणखी काही गुन्हे गाडेने केले असल्याचा संशय पोलिसांना आहे.