File Photo : MAHARASHTRA POLICE
ठाणे जिल्ह्यात अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. या बदल्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केल्या गेल्याचे सांगितले जात आहे. या बदल्यानंतर राजकीय आणि नागरीकांमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सत्तेमधील एका नेत्याचं वर्चस्व कमी करण्यासाठी सत्तेमधील दुसऱ्या पक्षाच्या नेत्याने ही खेळी केली आहे का असा तर्कवितर्क व्यक्त केला जात आहे. या बदल्यांचा परिमाण काही दिवसात समोर येणार आहे.
कल्याण डोंबिवलीत भाजप आणि शिवसेनेत सुरु असलेली धूसफूस कितीही प्रयत्न केले तरी थांबत नाही. विरोधी पक्षात असताना देखील या दोन्ही पक्षात कल्याणमध्ये वाद होता. सत्तेत एकत्रित आल्यावरही दोन्ही पक्षांमधील नेत्यांमध्ये सूत जुळलेले नाही. अनेक अशी उदारहणे आहे. ज्यात दिसून आले की, एका पक्षाच्या कार्यकर्त्यांवर दबाव टाकण्याचे प्रयत्न झाले आहेत. यात पोलिसांचाही वापर केला गेला आहे. मानपाडा पोलीस ठाण्याचे एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बदली यामुळे करण्यात आली की, त्यांनी एका महिलेच्या तक्रारीवर एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. नंतर काही महिन्यांनी त्यांची बदली दुसऱ्या ठिकाणी करण्यात आली. मानपाडा पोलीस ठाणे असो, कोळसेवाडी पोलीस ठाणे असो, विष्णूनगर किंवा रामनगर पोलीस ठाणे असो. या पोलीस ठाण्यात राजकीय वर्चस्वाच्या लढाईमुळे ताण वाढला आहे हे कोणी नाकारु शकत नाही.
सर्वात भनायक परिस्थिती कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आहे. या ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील वाद जगजाहिर आहे. कार्यकर्त्यांमध्ये पोलिसांच्या कारवाई बद्दल अनेकदा शंका व्यक्त केली गेली आहे. त्याची चर्चा सुरु असते. जाणीवपूर्वक कोणावर कारवाई होऊ नये असा पोलिसांचा प्रयत्न असतो. सध्या दोन दिवसात असे दोन प्रकार कल्याण पूर्वेत घडले. ज्यामध्ये राजकीय वातावरण तापले. आता हे सर्व होत असताना कल्याण डोंबिवलीतील वरिष्ठ पोलीस निरिक्षक आणि पोलीस निरिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. हे पोलीस अधिकारी दोन ते तीन महिन्यापूर्वीच पोलीस ठाण्यात रुजू झाले होते. एका माेठ्या नेत्याचे वर्चस्व कमी करण्यासाठी त्यांच्या मर्जीतील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे का? अशी जोरदार चर्चा रंगली आहे. आता खरे काय खोटे काय हे येणारा काळच ठरविणार आहे. परंतू या बदल्यांचा परिमाण काही दिवसात दिसून येईल.