फोटो सौजन्य: iStock
सणांचा उत्साह ओसरल्यानंतर लगेच लग्नाचा हंगाम सुरू होणार आहे आणि नवविवाहित जोडप्यांसाठी हनिमूनची तयारी महत्त्वाची असते. जर तुम्हाला तुमची हनिमून ट्रीप परफेक्ट बनवायची असेल, तर भारतातील या सुंदर ठिकाणांची निवड तुम्ही करू शकता. या ठिकाणी तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत छान वेळ घालवू शकता. आज आपण भारतातील पाच सर्वोत्तम हनिमून डेस्टिनेशन्सची बद्दल जाणून घेणार आहोत. ही ठिकाणे तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला नक्कीच आवडतील.
जम्मू आणि काश्मीर
जम्मू-काश्मीरला ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ म्हटले जाते. नवविवाहित जोडप्यांच्या हनिमूनसाठी पहिली पसंती जम्मू आणि काश्मीर असते. हिवाळ्यात, काश्मीर बर्फाच्या दाट चादरीने झाकलेले असते. यामुळे काश्मिरचे नैसर्गिक सौंदर्य आणखीनच खुलते. काश्मिरमध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत सुंदर हिमवर्षावाचा आनंद घेऊ शकता. तसेच, साहसप्रेमी जोडप्यांसाठी स्कीइंग आणि स्नो बोर्डिंग सारखे उपक्रम उपलब्ध आहेत. काश्मीरच्या सुंदर दऱ्या, शांत तळी आणि बर्फाच्छादित पर्वत रांगा तुम्हाला मोहून टाकतील.
औली, उत्तराखंड
उत्तराखंडमधील औली हे ठिकाण हिवाळ्यात नवविवाहितांसाठी एक उत्तम डेस्टिनेशन आहे. औलीमधील बर्फाच्छादित पर्वत, निसर्गरम्य दृश्ये आणि रोमँटिक वातावरण हे हनिमूनसाठी परिपूर्ण आहेत. जोशीमठ, पांडुकेश्वर आणि गोपेश्वरच्या टेकड्यांवरून तुम्ही सुंदर सूर्योदय आणि सूर्यास्त तुमच्या जोडीदारासोबत पाहू शकता. औलीमधील बर्फात मस्ती करताना तुम्ही चविष्ट गढवाली पदार्थांचाही आस्वाद घेऊ शकता.
अंदमान निकोबार
अंदमान निकोबार बेटं आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत. या बेटावर शांत निळे पाणी, पांढरी वाळू आणि भरपूर हिरवळ तुमच्या हनीमूनसाठी योग्य ठरतील. नवविवाहित जोडप्यांमध्ये हे ठिकाण खूप लोकप्रिय आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक क्षण घालवू इच्छित असाल तर अंदमान निकोबारमध्ये हनिमूनची योजना करा. साहसप्रेमींसाठी स्कूबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंग सारखे उपक्रम या ठिकाणी आहेत.
मुन्नार, केरळ
केरळमधील मुन्नार हे नवविवाहित जोडप्यांसाठी हनिमून डेस्टिनेशन म्हणून खूप प्रसिद्ध आहे. हे एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. या हिलस्टेशनचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. मुन्नारमध्ये तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चहाच्या बागा, भरपूर हिरवळ आणि अनेक सुंदर दृश्ये पाहू शकता. तुम्ही नयनरम्य दऱ्यांमध्ये ट्रेकिंगसाठीही जाऊ शकता.
उटी, तामिळनाडू
उटी हे दक्षिण भारतातील लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. या शहराला हिल स्टेशन्सची राणी असे म्हणतात. उटीमध्ये तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत परफेक्ट हनिमूनचा आनंद घेऊ शकता. तुम्ही प्रसिद्ध टॉय ट्रेनमध्ये सफर करू शकता आणि येथे विविध निसर्गरम्य ठिकाणांचे दर्शन घेऊ शकता.
भारतातील ही पाच ठिकाणं तुमच्या हनिमूनला अविस्मरणीय बनवतील. प्रत्येक ठिकाणाचे वेगळेपण आणि सौंदर्य तुमच्या जोडीदारासोबत घालवलेल्या क्षणांना खास बनवेल.