सौजन्य: सोशल मीडिया
पॅलेस ऑफ व्हर्साय: फ्रान्समधील व्हर्साय पॅलेस हा जगभरातील कला आणि इतिहास प्रेमींसाठी प्रमुख आकर्षणचे केंद्र बनले आहे. हा राजवाडा पॅरिसपासून 19 किलोमीटर अंतरावर आहे. फ्रान्सच्या राजाने व्हर्साय नावाच्या ठिकाणी हा राजवाडा बांधला होता. हा राजवाडा व्हर्साय नावाच्या ठिकाणी बांधण्यात आल्यानमुळे त्याला हे नाव दिले गेले. 45 वर्षांपूर्वी याला युनेस्कोकडून हेरिटेज दर्जा मिळाला होता. आज येथे 60 हजार गोष्टींचा दुर्मिळ संग्रह आहे. जे जगभरातील आकर्षणाचे केंद्र बनले आहे. हे ठिकाण पर्यटकांसाठी खास का आहे ते जाणून घेऊया.
या ठिकाणाबद्दल काही खास गोष्टी
व्हर्साय, फ्रान्समधील हा ३६३ वर्षे जुना राजवाडा त्याच्या दुर्मिळ संग्रहासाठी प्रसिद्ध आहे.
नेपोलियनने या भव्य राजवाड्याचा उन्हाळ्यातील त्याचे निवासस्थान म्हणून वापर केला.
व्हर्साय पॅलेसमध्ये 50 वर्षांपर्यंत अनेक नवनवीन बांधकामे होत राहिली.
50 वर्षांमध्ये राजवाड्याचे नूतनीकरण होत राहिले.
फ्रान्सचा राजा लुई 13 याने 1623 मध्ये येथे प्रथम शिकार लॉजची स्थापना केली होती. वास्तुविशारद फिलिबर्ट ले रॉय यांनी लॉजचे रूपांतर लुईच्या राजवाड्यात केले, पण त्याच्या मृत्यूनंतर 1661-1715 दरम्यान राजवाड्यामध्ये अनेक बदल करण्यात आले. लुई चौदाव्याने या जागेला एक भव्यता दिली. 1682 मध्ये, लुई चौदाव्याने त्याच्या न्यायालयाचे आणि सरकारचे मुख्यालय व्हर्साय येथे हलवले आणि ते फ्रान्सची राजधानी बनले. त्याच्या नंतरच्या शासकांनी ही प्रथा चालू ठेवली आणि त्यांनतर पुढील 50 वर्षांमध्ये राजवाड्याचे नूतनीकरण होत राहिले. त्याच वेळी, 1789 मध्ये, शाही कुटुंब आणि फ्रान्सची राजधानी पॅरिसला परत आली.
पर्यटकांसाठी ते खास का आहे?
दुर्मिळ वस्तूंचा मोठा संग्रह येथे आहे. फ्रान्सच्या इतिहासाचे संग्रहालय १८३७ साली येथे सुरू झाले. आज कलाकृती, शिल्प, चित्रे, झुंबर इत्यादी 60 हजार गोष्टींचा मोठा संग्रह या राजवाद्यामध्ये आहे.
व्हर्सायचे चॅपल
फ्रान्समधील व्हर्साय पॅलेसच्या परिसरात एक चॅपल देखील आहे. हे दोन स्तरांवर बांधलेले आहे. विशेष बाब म्हणजे याचे छत धार्मिक कथांमधील पात्रांनी रंगवले आहे.
लॅटोना फाउंटन
हा एक अतिशय सुंदर कारंजा आहे जो राजवाड्यात आहे. जो राजवाड्याचे सौंदर्य वाढवतो. त्याच्या वरच्या भागात लटोना देवीची मूर्ती आहे. जिला सूर्य आणि चंद्र देवतांची माता मानले जाते. या महाकाय कारंज्याचे नाव यातूनच प्रेरित आहे.
युनेस्कोकडून हेरिटेज दर्जा मिळाला
या राजवाड्याला आणि त्याच्या उद्यानाला 1979 मध्ये युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला होता हे तुम्हाला माहीत आहे का? आम्ही तुम्हाला सांगतो की, फ्रेंच सांस्कृतिक मंत्रालयाने सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या वास्तूंच्या यादीत या राजवाड्याचा समावेश केला आहे. राजवाड्यात अनेक ठिकाणी संगमरवरी भिंती आणि सोन्याचे दरवाजे आहेत.
नेपोलियनचा काळ कसा होता?
फ्रेंच राज्यक्रांतीनंतर हा राजवाडयाकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. यादरम्यान एकदा सत्तापालट झाला. आणि नेपोलियन सम्राट झाल्यांनतर त्याच्या कारकिर्दीत ग्रीष्मकालीन निवासस्थान म्हणून फ्रेंच बरोक शैलीत बांधलेल्या या महालाचा वापर केला. 1815 मध्ये, नेपोलियनच्या पतनानंतर, पुढील शासकांनी अनेक वास्तुविशारदांच्या मदतीने राजवाडा पुन्हा विस्तारित केला.






