फोटो सौजन्य: सोशल मीडिया
श्रीनगर : अशा सुंदर ठिकाणी जाण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते तिथे जाताच ते सर्व काही विसरून तिथल्या प्रेक्षणीय स्थळांमध्ये हरवून जातात. तुम्हालाही तुमच्या पार्टनरसोबत अशा ठिकाणी जायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जाणून घ्या अशाच एका ठिकाणाबद्दल जे जिवंतपणी स्वर्गात असल्याचा फील देत. इथे आल्यावर खरंच स्वर्गात आल्यासारखे वाटेल. कारण इथे चहूबाजूंना फक्त फुलेच फुलेच आहेत. अशा ठिकाणाची कल्पना फक्त स्वप्नातच केली जाऊ शकते. सुंदर हिरवाईने नटलेले पर्वत आणि दऱ्या खोऱ्या. झुळझुळ वाहणाऱ्या नद्या आणि मन मोहून टाकणारे वातावरण.
पृथ्वीवर पहा स्वर्ग
जर तुम्हाला स्वर्ग पाहायचा असेल, तर भारतातील सर्वात प्रसिद्ध व्हॅली ऑफ फ्लॉवर्स उत्तराखंडमध्ये आहे. येथे 300 हून अधिक प्रकारची फुले पाहायला मिळतील. हे ठिकाण सहलीला आणखी रंजक बनवेल. असे दृश्य तुम्ही भारतात कुठेही पाहिले नसेल. आणि येथे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत रोमँटिक स्टाईलमध्ये फोटोशूट देखील करू शकता.
फुलांची दरी उत्तराखंड
येथे येण्याचा उत्तम काळ म्हणजे हिवाळा आणि पावसाळा. एकदा या ठिकाणी आल्यांनतर पुन्हा पुन्हा येऊ वाटेल असे हे ठिकाण. व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचे दृश्य पाहण्यासाठी तुम्हाला प्रति व्यक्ती 150 रुपये मोजावे लागतील. 1 जूनपासून व्हॅली ऑफ फ्लॉवर्स पर्यटकांसाठी खुली करण्यात आली होती, जी आता 31 ऑक्टोबरला बंद होणार आहे.
शिमल्यातील फुलांच्या खोऱ्यांना भेट द्या
उत्तराखंड व्यतिरिक्त आपण शिमला, हिमाचल प्रदेश येथे अनेक फुलांच्या वेली पाहू शकता. येथे तुम्हाला रोझ गार्डन, ट्युलिप गार्डन यांसारख्या अनेक ठिकाणी भेट द्यायला मिळेल. इतकेच नाही तर तुम्ही दार्जिलिंगला जाऊन तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक क्षण घालवू शकता.
तसेच पार्टनरसोबत ट्रेकिंगदेखील करू शकता
येथे तुम्हाला अनेक फुलांच्या बागा पाहायला मिळतील. ऑर्किड, रोडोडेंड्रॉन आणि अनेक प्रकारची फुले येथे पाहायला मिळतील. फुलांचे इतके सुंदर दृश्य तुम्ही इतरत्र कुठेही पाहिले नसेल. या फुलांच्या दऱ्यांमध्ये तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत ट्रेकिंगला जाऊ शकता. ट्रेकिंग दरम्यान घालवलेला प्रत्येक क्षण तुम्हा दोघांनाही कायम स्मरणात राहील.
कॅम्पिंगचा आनंद घ्या
इतकंच नाही तर निसर्गाच्या सानिध्यात रात्र काढायची असेल तर तुम्ही इथे कॅम्पिंगचा आनंद घेऊ शकता. तारांकित आकाशाखाली फुलांच्या बिछान्यात घालवलेली रात्र स्वर्गापेक्षा कमी नाही. नवीन लग्नानंतर तुम्ही दोघे पती-पत्नी पृथ्वीवर स्वर्गाचा आनंद घेण्यासाठी येथे पोहोचू शकता.