राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. अशा परिस्थितीत याविषयी सरकार काहीच बोलत नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीविषयी आम्ही आवाज उठवणार असल्याची माहिती त्यांनी लातुरात बोलताना दिली. अवकाळी पावसामुळे राज्यात आत्तापर्यंत ५५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. आता पेरणीचा वेळ येतेय, पेरणीसाठी बी-बियाणे आणि खते शेतकऱ्यांना घ्यायची आहेत, अशा स्थितीत शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले आहेत. धुळे येथील शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या पैशांसंदर्भातील प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी अंबादास दानवे यांनी केली आहे.