अंबरनाथमधील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एक राखी सैनिकांसाठी हा स्तुत्य उपक्रम राबवला आहे. या उपक्रमात जवळपास साडेचार ते पाच हजार राख्या विद्यार्थ्यांना तयार केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांपैकी 200 राख्या आणि त्यासोबत विद्यार्थ्यांनी सैनिकांसाठी लिहिलेली 200 पत्रं सैनिकांना पाठवण्यात येणार आहेत. शहरातील शासकीय कार्यालये, पोलीस ठाणे, तहसील कार्यालयात अधिकारी कर्मचारी यांना राखी बांधून विद्यार्थिनी रक्षाबंधन साजरी करणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून राखी पौर्णिमेनिमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती सोबतच राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी, कौशल्य विकास आणि व्यवसायिक दृष्टीकोन निर्माण व्हावा, यासाठी एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम शाळेत सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमधील कला गुणांना वाव मिळत असून सामाजिक बांधिलकी देखील निर्माण होते, असं शाळेच्या शिक्षकांनी सांगितलं आहे.