मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजना जाहीर केली. या योजनेत त्यांनी सहा, आठ आणि बारा हजार असे मानधन देणार असल्याचे जाहीर केले. लाडक्या भावाला सहा, आठ आणि बारा हजार देताय तर लाडक्या बहीणीला पंधराशे का? महिलांची किंमत एवढी कमी आहे का? असा सवाल खडसावून काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी विचारला आहे. शिकलेल्या महिलांना पैसे का देत नाहीत ? फक्त मतदानासाठी तुम्ही करत आहात का ? लाडक्या बहीणीला देखील 5 हजारांच्यावर पैसे देण्यात यावेत अशी माझी मागणी आहे असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. (फोटो सौजन्य – सोशल मीडिया)