पारंपरिक पिकांची परंपरा मोडीत काढत गोंदियातील एका शिक्षक शेतकऱ्याने आधुनिक विचारसरणीचा अवलंब करत शेतीत यशस्वी प्रयोग केला आहे. या शेतकऱ्याने धान, गहू, कापूस अशा पारंपरिक पिकांऐवजी पेरू आणि आंब्याची नगदी शेती सुरू केली असून, आज तो दरवर्षी ५ ते ६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहे.शिक्षक असल्यामुळे शिक्षणासोबतच शेतीत काहीतरी वेगळं करण्याची तळमळ त्यांच्यात होती. पारंपरिक पिकांमधून फारसा नफा होत नसल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी नवीन प्रयोग करण्याचं धाडस केलं. सुरुवातीला अनेकांनी शंका व्यक्त केली, मात्र सातत्याने प्रयत्न करत त्यांनी फळबाग शेतीत आपलं स्थान निर्माण केलं.आज त्यांच्या शेतीत उच्च प्रतीचे पेरू आणि आंबा उत्पादित होतो. उत्पादनाची मागणी स्थानिक बाजारातच नव्हे तर इतर जिल्ह्यांमध्येही आहे. कमी खर्चात जास्त नफा मिळाल्याने त्यांनी इतर शेतकऱ्यांनाही नगदी पिकांकडे वळण्याचे आवाहन केले आहे.