कल्याणमध्ये अनधिकृत बांधकामाबाबत पालिका अॅक्शनमोडवर काम करत आहे. विनापरवानगी बांधकामावर कारवाईसाठी पाहणी सुरु असताना पालिका अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला आहे. कल्याणजवळील वडवली येथे अनधिकृत बांधकामांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या केडीएमसी पथकावर हल्ला झाला. शिवसेना (शिंदे गट)चे माजी नगरसेवक दुर्योधन पाटील, त्यांचा मुलगा वैभव पाटील आणि त्यांच्या साथीदारांनी बंदूकीचा धाक दाखवत अधिकाऱ्यांना मारहाण केली आणि गाड्यांची तोडफोड केली. यापूर्वीही केडीएमसीच्या कर्मचाऱ्यांना बांधून मारहाण करण्यात आली होती. याबाबत आता पोलीस यंत्रणा सखोल चौकशी करत आहे.