Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Crime: बेपत्ता शिक्षिकेचा मृतदेह घोटीत सापडला; प्रॉपर्टीच्या हव्यासातून हत्या; अनेक वर्षांचा मित्रच निघाला मास्टरमाइंड

कल्याणमधील बेपत्ता शिक्षिका संगीता चंदनशिवे यांच्या हत्येचा उलगडा पोलिसांनी केला. अनेक वर्षांच्या परिचिताने प्रॉपर्टीच्या वादातून साथीदारांच्या मदतीने त्यांचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. एटीएम कार्ड वापरल्याचा सुगावा लागल्यानंतर पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचत तिघांना अटक केली असून एका आरोपीचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 23, 2026 | 09:32 AM
  • बेपत्ता शिक्षिका संगीता चंदनशिवे यांचा मृतदेह घोटी परिसरात आढळल्यानंतर हत्येचा उलगडा झाला.
  • प्रॉपर्टीच्या वादातून परिचित गोकुळ आव्हाड याने साथीदारांसह खून केल्याचा पोलिसांचा आरोप.
  • एटीएम व्यवहार आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढत तिघांना अटक.
कल्याण: कल्याण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या मित्राने प्रॉपर्टीच्या वादातून शिक्षिकेची हत्या केल्याचे समोर आले आहे. त्यांचा मृतदेह घोटी येथे आढळून आला. या हत्याकांडात आरोपीने आपल्या तीन साथीदारांची मदत घेतली आणि हा हत्याकांड घडवून आणला. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर आरोपींचा शोध सुरु आहे.

नेमकं काय घडलं?

हत्या झालेल्या शिक्षिकाचे नाव संगीता चंदनशिवे असे आहे. १४ जुलै रोजी कल्याण पश्चिमेतील मोहने परिसरात राहणाऱ्या शिक्षिका संगीता चंदनशिवे या नेहमीप्रमाणे शाळेसाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्यानंतर त्यांना आसनगाव येथे एलआयसीच्या कामानिमित्त जायचे असल्याचे त्यांनी काही नातेवाईकांना सांगितले होते. मात्र संध्याकाळ झाली तरी ते घरी परतले नव्हते. कुटुंबीयांनी त्यांची वाट बघितली मात्र शिक्षिका घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

अखेर चार दिवसांनी शिक्षिकेचा मृतदेह घोटी परिसरातील एका रुग्णालयाजवळ आढळून आला. पोलिसांनी हत्येचा संशय व्यक्त करत तपासाला सुरुवात केली. शिक्षिकेच्या एटीएम कार्डचा वापर करून घोटी येथे पैसे काढण्यात आल्याचे पोलिसांच्या निर्दशनास आले. एटीएमच्या सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. तिसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.

Ambarnath Crime: थरकाप उडवणारी घटना! वरवंट्याने डोक्यावर वार, गुप्तांगावर…; 7 वर्षीय मुलाची आईच्या प्रियकराकडून हत्या

का केली हत्या?

गोकुळ आव्हाड हा संगीता चंदनशिवे यांचा परिचित असून दोघांमध्ये अनेक वर्षांपासून मैत्री होते. संगीता चंदनशिवे यांच्या मालमत्तेवर हक्क मिळावा यासाठी तो सातत्याने दबाव टाकत होता. मात्र त्यांनी त्यास नकार दिल्याने त्याने कट रचल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, गोकुळ आव्हाड याने आपल्या साथीदार तुषार पारखे, विनोद पांडे आणि संतोष जाधव यांच्या मदतीने संगीता चंदनशिवे यांना विश्वासात घेऊन घोटी परिसरात नेले. तेथे त्यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत; 24 तास बाथरूमचा नळ सुरू… अन् ‘त्या’ एका व्हॉईस मेलने पोलिसही चक्रावले!

कल्याण येथून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. बंद फ्लॅट… बाथरूममध्ये अखंड सुरू असलेला नळ… घरातून येणारी असह्य दुर्गंधी… आणि त्यानंतर आलेला एक व्हॉईस मेल. या एका संदेशाने पोलिसांसह संपूर्ण परिसर हादरला. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा बाथरूममध्ये गोणीत भरलेला एका व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. प्रियकराचा खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपी महिलेने तब्बल 24 तास बाथरूमचा नळ सुरू ठेवल्याचा धक्कादायक प्रकार तपासात समोर आला असून, या हायप्रोफाइल मर्डर मिस्ट्रीचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

Mumbai Crime: पंचर काढताना चोराने मारला डल्ला; 111 लाख 55 हजार रुपये केले लंपास; अवघ्या २४ तासात आरोपी जेरबंद

Web Title: Kalyan crime body of missing teacher found in ghoti murder driven by greed for property long time friend turns out to be the mastermind

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 09:32 AM

Topics:  

  • Alibaug
  • crime
  • kalyan
  • Kalyan Crime
  • Protest
  • Student Protest

संबंधित बातम्या

Thane Crime: गर्लफ्रेंड वॉशरूमला गेली असं सांगून प्रियकर पळाला; रूम उघडताच समोर आलं धक्कादायक दृश्य
1

Maharashtra Breaking News Updates Today: जंतर मंतरवर रात्री पुन्हा राडा, नेमकं घडलं काय?
2

Thackeray Brothers: महाराष्ट्र पेटणार! विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार; २६ जुलैला मुंबईत ‘संयुक्त मोर्च’
3

Alibaug : दिल्लीतील लाठीचार्जचे पडसाद रायगडात, शेकापच्या बैठकीत विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा
4

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.