लोकलमधील गर्दी, तिकीट काउंटर वरील गर्दीत संधी साधून प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जोगिंदर लबाना असे या चोरट्याचे नाव असून तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. मूळचा दिल्लीचा असलेला जोगिंदर दिल्लीत ट्रेनमध्ये चोरी करायचा आणि त्यानंतर तो कल्याणमध्ये आला. येथे त्याने काही काळ रिक्षा चालवली, मात्र नंतर तो रिक्षा चालवणे सोडून व्यसनाच्या आहारी गेला आणि जुगार खेळायला लागला. त्यामुळे त्याला पैशांची चणचण जाणवू लागली. त्यातून पुन्हा चोरीच्या मार्गाकडे वळला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला असल्याचे सांगण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – अमजद)