गेल्या महिन्यात शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात मुंबईतील आझाद मैदानात शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनाविषयी बोलताना विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आझाद मैदानात जेवढे लोक आले त्यापेक्षा तिप्पट शक्तीपीठ महामार्ग पाहिजे असे म्हणायला लोक येतील असे वक्तव्य फडणवीस यांनी केले होते. आम्ही त्यांचे आव्हान स्वीकारले आहे. फक्त येताना सोबत सातबारा घेऊन यावे, असे म्हणत शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीस प्रति आव्हान दिले. मराठवाडा शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने लातुरात आयोजित राज्यस्तरीय परिषदेत ते बोलत होते. या परिषदेस राज्यातील बारा जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.शक्तीपीठ महामार्गासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत, असे ते म्हणाले.