नवी मुंबईतील 14 वर्षीय विद्यार्थ्याच्या सहलीदरम्यान मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आक्रमक झाला आहे. स्वराज्य पक्षाने नवी मुंबई मनपा मुख्यालयाबाहेर आंदोलन केले. शिक्षणाधिकाऱ्याच्या पुतळ्याला जोडे मारून नियमांची उल्लंघन आणि विद्यार्थ्याच्या हत्येचा आरोप अंकुश कदम यांनी केला. नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत इयत्ता 6 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांकरिता इमॅजिका थीम पार्क, खोपोली येथे दिनांक 17 फेब्रुवारी 2025 पासून शालेय सहलीचे नियोजन करण्यात आले होते. संध्याकाळी 5 वा. सुमारास पुन्हा परतण्यासाठी थीम पार्क मधून बसमध्ये बसविण्याकरिता मुलांना एकत्र करण्याचे काम शिक्षक करत होते. त्याच वेळी कु. आयुष धर्मेंद्र सिंह हा इयत्ता 8 चा विद्यार्थी बाकडयावर बसत असताना चक्कर येऊन जमिनीवर पडल्याचे फुटेज मध्ये दिसून येते. त्यानंतर तात्काळ इमॅजिका व्यवस्थापनाचे डॉक्टर यांनी त्याला मेडीकल सेंटरमध्ये नेऊन प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. परंतू सदर विद्यार्थ्याकडून कोणत्याही प्रतिसाद मिळत नसल्याने त्याला तात्काळ कार्डिअॅक अॅम्बुलन्समधून डॉक्टरांसह नजीकच्या हार्ट स्पेशालिस्ट पार्वती हॉस्पीटल येथे दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हा विद्यार्थी मृत झाल्याचे घोषित केले.