(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलीवूड अभिनेता हर्षवर्धन राणे सध्या त्यांच्या नवीन चित्रपट ‘एक दीवाने की दीवानियत’मुळे चर्चेत आहेत.मधल्या काळात तो त्याच्या परीक्षेमुळे चर्चेत होता. हर्षवर्धन मानसशास्त्राचं शिक्षण घेत आहे. मध्यंतरी त्याचे कॉलेजमध्ये पेपर लिहितानाचे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले होते. या चित्रपटात त्यानं रोमँटिक नायकाची भूमिका साकारली आहे. हर्षवर्धन याने त्याच्या वडिलांच्या प्रेमसंबंधांबद्दल एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
रोमँटिक भूमिका करण्याबाबत बोलताना हर्षवर्धनने लहानपणीच्या आठवणी शेअर केल्या. त्याने सांगितले, “मी माझ्या वडिलांना वेगवेगळ्या वेळा ५-६ पार्टनर्ससोबत पाहिले. मी गुपचूप त्यांना पाहायचो आणि त्यांच्या प्रेम, इमोशनल कनेक्ट आणि नात्यांची ओढ समजून घेण्याचा प्रयत्न करायचो.लहानपणी मी त्यांच्या भावनांना त्यांना ऑकवर्ड न वाटू न देता त्यांना समजून घ्यायचो.अशा भूमिका करणं आपण आपल्या वडिलांच्या ५-६ रिलेशनशिपमधून शिकलो आहे असं हर्षवर्धन राणेने सांगितलं.
Stranger Things चा सीझन ५ लवकरच थिएटर्समध्ये होणार दाखल, ‘या’ दिवशी चित्रपट होणार रिलीज
यानंतर हर्षवर्धनने कोस्टार सोनम बाजवाचं कौतुक करत सांगितलं, “सोनम माझी आतापर्यंतची सर्वात उत्तम सहकलाकार आहे. तिच्यात खूप टॅलेंट आहे जे अजून पूर्णपणे समोर आलेलं नाही. ती खरी कलाकार आहे, संवेदनशील आहे. ती फक्त कमर्शियल हिरोईन नाही, तर अशी अभिनेत्री आहे जी आपल्या डोळ्यांनी आणि शांततेतूनही अभिनय जिवंत करू शकते. जेव्हा ती एखाद्या भूमिकेत असते, ती स्वतःला पूर्णपणे झोकून देते. मला वाटतं इंडस्ट्रीने अजून तिचं टॅलेंट ओळखलेलं नाही.”
‘कांतारा चैप्टर 1’ची ३ आठवड्यांत बजेटपेक्षा 351% जास्त कमाई,22व्या दिवशी ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ची परिस्थिती बिकट
हर्षवर्धन राणेने 2016 मध्ये पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेनसोबत ‘सनम तेरी कसम’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. सुरुवातीला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा गाजला नाही, पण नंतर सोशल मीडियावर त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. पुन्हा प्रदर्शित झाल्यावर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले.






