बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील भाजप कार्यकर्ता व भाजपा आ.संजय कुटे यांचा कारचालक पंकज देशमुख याचा 3 मे रोजी संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला होता. पंकज देशमुख यांच्या पत्नीने ही आत्महत्या नसून घातपात आहे व या घातपातात राजकीय व्यक्तींचा हात असून संपूर्ण मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी झालीच पाहिजे ही मागणी लावून धरली. विधिमंडळातही आ.संजय कुटे यांनीही या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. जळगाव जामोद येथील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी ही मागणी रेटून धरण्यासाठी न्याय हक्क जन आंदोलन समिती स्थापन केली आहे. या समितीने आज जळगाव जामोद शहर बंदच आवाहन केलं आहे…या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळत आज जळगाव जामोद शहर सकाळपासूनच कडकडीत बंद आहे.शहरातील सर्व आस्थापना बंद असून या संपूर्ण मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणी आता जोर धरू लागली आहे..