1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त पुणे ग्रामीण पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच एनडीआरएफ, डी डी एस, एस आर पी, आरोग्य केंद्र देखील आहेत. नगर रोडवरील वाहतूक 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला बंद राहणार आहे. नगर रोड वरून येणारी वाहने सोलापूर रोड आणि आळेफाटा या दोन्हीकडून वळवण्यात आली आहेत. तसेच वक्फ बोर्डाची जवळपास 60 एकरची पार्किंग उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुणे शहराच्या बाजूने येणाऱ्या अनुयायांना पीएमपीएमएलच्या 300 बसेस डिग्रजवाडी फाटा इथे विजय स्तंभापर्यंत जाण्याकरता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक दर्जापासून तर सब इंस्पेक्टर पर्यंत अशी 300 च्या वर पोलीस अधिकारी या पूर्ण बंदोबस्तासाठी तैनात असतील अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे.