कर्जत तालुक्यातील मानिवली गावात रहाणाऱ्या रोहित गवळी या 16 वर्षीय मुलाला नेरळ येथील रायगड हॉस्पिटल मध्ये 20 फेब्रुवारी 2024 रोजी उपचारासाठी दाखल केले. त्याच्या शास्त्रक्रिये दरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रोहितच्या नातेवाईकनी डॉक्टरांच्या हलगर्जी व चुकीची शस्त्रक्रिया केली म्हणून रायगड हॉस्पिटल मध्ये तोडफोड केली होती व नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पण अद्याप पोलिसांनी कोणावर ही कारवाई न केल्याने भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मृत रोहित गवळी याच्या परिवाराची भेट घेतली व नेरळ पोलीस ठाण्यात भेट दिली. व अद्याप का कारवाई झाली नाही असा जाब विचाराला आणि जर आठ दिवसांत रायगड हॉस्पिटल व संबंधित डॉक्टर्स वर गुन्हा दाखल करून त्यांना अटक नाही केली तर आठ दिवसांनी गवळी कुटुंबासह पोलीस ठाण्यासमोर कारवाई होत नाही तो पर्यंत ठिय्या आंदोलन करणार असा किरीट सोमय्या यांनी ईशारा दिला आहे.